Eknath Shinde, Devendra Fadanvis, Ajit Pawar 
गोवा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

Goa CM Pramod Sawant On Maharashtra Assembly Election Result: आत्तापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार महायुतीला २२८ जागांवर आघाडी मिळाली असून, महाविकास आघाडी ५५ जागांवर आघाडीवर आहे.

Pramod Yadav

Goa CM Pramod Sawant On Maharashtra Assembly Election Result

पणजी: सर्व देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार महायुतीला २२९ जागांवर आघाडी मिळाली आहे तर, महाविकास आघाडीला ५४ जागा मिळाल्याचे दिसत आहे. महायुतीच्या विजयावरुन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महायुतीला शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एक है तौ सेफ है चा नारा देत महायुतीला विजायच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा जनतेच्या विश्वासाचा, सर्वांगीण विकासाच्या संकल्पाचा विजय आहे! भाजप महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महायुतीला शुभेच्छा दिल्या आहेत.

"भाजप महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी केल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे मनापासून अभिनंदन आणि आभार. हा विजय जनतेचा पायाभूत सुविधा विकास, सामाजिक विकास आणि एका स्थिर सरकारसाठी जनतेने दिलेला आशीर्वाद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पावर यांच्या नेतृत्वाला, विकासाच्या दृष्टीला मिळालेला आशीर्वाद आहे."

"कार्यकर्ता हा भाजप महायुतीचा पाया आहे, भाजप महायुतीचा संकल्प जनतेसमोर घेऊन जाण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मी सर्व कार्यकर्ते, हितचिंतक आणि भाजप महायुती प्रेमींचे हार्दिक अभिनंदन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली डबल इंजिन सरकार महाराष्ट्राची घोडदौड सुरु ठेवेल याची मला खात्री आहे", असे प्रतिक्रिया मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक्सवर व्यक्त केली आहे.

निकाल (आत्तापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार)

महायुती - २२९ जागांवर आघाडी

भाजप - १३३

शिवसेना (एकनाथ शिंदे) - ५६

राष्ट्रवादी (अजित पवार) - ४०

महाविकास आघाडी - ५४

शिवसेना (उद्धव ठाकरे) - १९

काँग्रेस - २०

राष्ट्रवादी शरद पवार - १५

आणि इतर - ५

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या गोव्यातील इतर घडामोडी

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

Heart Attack: तुमचं हृदय सेफ आहे का? हिवाळ्याच्या दिवसांत हर्ट अटॅकचं प्रमाण वाढतंय; 'हे' उपाय करा, स्वतःची काळजी घ्या

SCROLL FOR NEXT