Goa Congress: खासदार विरियातो, प्रदेशाध्यक्ष पाटकर पोलिसांच्या ताब्यात; काँग्रेसचे कॅश फॉर जॉब विरोधात आंदोलन

Cash For Job Scam Congress Protest: गोव्यातील नोकरी घोटाळ्याविरोधात शुक्रवारी युथ काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.
Goa Congress: खासदार विरियातो, प्रदेशाध्यक्ष पाटकर पोलिसांच्या ताब्यात; काँग्रेसचे कॅश फॉर जॉब विरोधात आंदोलन
Police Detain Amit Patkar, MP Viriato Fernandes And Congress Party WorkersDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Cash For Job Scam Congress Protest

पणजी: गोव्यात गाजत असलेल्या कॅश फॉर जॉब घोटाळ्याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्याची मागणी काँग्रेसने केली. यासाठी पणजीतील आझाद मैदान येथे आंदोलन करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, खासदार विरियातो फर्नांडिस यांच्यासह पादधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Congress Protest
Congress ProtestDainik Gomantak

गोव्यात गेल्या एक महिन्यापासून सरकारी नोकरीच्या आमिषाने पैसे घेऊन फसवणूक करण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. यात अनेकांचा सहभाग असल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसने याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करण्याची मागणी केली आहे.

Congress Protest
Congress ProtestDainik Gomantak

SIT च्या मागणीसाठी युथ काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन देखील करण्यात आले. युथ काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री सावंत आणि मंत्री गावडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली.

Congress Protest
Congress ProtestDainik Gomantak

नोकरी घोटाळाप्रकरणात (Cash For Job Scam) आजवर अनेकांना अटक करण्यात आली आहे. यात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची उघडकीस आली आहे. दरम्यान, यातील मुख्य सूत्रधार पूजा नाईक हिच्यासह श्रुती प्रभूगावकर, सोनिया आचारी, विषया गावडे तसेच, योगेश कुंकळ्ळीकर यांना जामीन मंजूर झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Damu Naik Congress latest statement
Goa protests in last five years
Karapur One Goa Project Protest
Gen Z Movement India
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com