Goa Christmas 2024 festive shopping celebration
पणजी: वर्षभर गोव्यात पर्यटकांची गर्दी असतेच, मात्र डिसेंबरमध्ये येणार नाताळ आणि नवीन वर्षाची सुरुवात यासाठी गोवा प्रसिद्ध आहे. यावर्षी देखील गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली असून रविवारी (२३ डिसेंबर) राज्यातील विविध बाजारांमध्ये नाताळच्या खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळाली. येत्या बुधवारी सगळीकडेच नाताळ साजरा केला जाणार असल्याने रविवारच्या सुटीच्या निमित्ताने अनेकांनी खरेदीसाठी बाजारात हजेरी लावली होती. राज्यातील हा उत्साह सगळीकडेच नाताळची जय्यत तयारी सुरु असल्याचं दर्शवतोय.
नाताळच्या सणात रंगीत झाड म्हणजेच ख्रिसमस ट्री फार महत्वाची असते. हे झाड सजवावं लागतं आणि यासाठी बऱ्याच लाईट्स आणि इतर सामानाची गरज असते.
शिवाय गवताचे गोठे, सान्ताक्लॉसचे कपडे यासारख्या वस्तू विकत घेण्यासाठी सुद्धा बाजारात खरेदी करणाऱ्यांनी भली मोठी गर्दी केली होती. या खरेदीमध्ये मिठाईचं सामान,लाईट्स आणि फुलांच्या हारांचा सुद्धा समावेश होता.
रविवारी अचानक वाढलेल्या गर्दीमुळे बाजारात मात्र चारचाकी चालकांचा खोळंबा झाला. गाडी पार्क करण्यासाठी सुद्धा पुरेशी जागा नसल्याने बराच वेळ वाहतुकीचा अडकून पडली होती. गोव्यात अनेक ठिकाणी रस्त्याचं काम देखील सुरु आहे आणि यामुळे अनेकवेळा वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. सध्या गोव्यातील अनेक घरांमध्ये नाताळची सजावट केलेली पाहायला मिळतेय, शिवाय चर्च तसेच चॅपलमधेही विधुतरोषणाई केली गेली आहे. नाताळच्या सणाची हीच उमेद नवीन वर्षाच्या सुरुवातीपर्यंत अशीच कायम राहील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.