Akshata Chhatre
काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ख्रिसमसची तयारी करण्यात गोवा व्यस्त झाला आहे.
यासोबतच गोव्यात सध्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा अवशेष प्रदर्शन सोहळा सुरु आहे.
अवशेष प्रदर्शन सोहळा आणि ख्रिसमस यांची एकत्र सांगड घालून सध्या गोव्यात तयारी सुरु झाली आहे.
ओल्ड गोवा चर्चच्या समोर ख्रिसमसची तयारी पाहायला मिळतेय.
रस्त्यांवर लाईट्सचा झगमगाट आहे, तर कुठे ख्रिसमसचे डेकोरेशन्स केलेले आहेत.
दहा वर्षांनी एकदा होणाऱ्या या अवशेष प्रदर्शनाच्या निमित्ताने यंदाचा ख्रिसमस गोव्यासाठी खास असेल.
ओल्ड गोव्याच्या बाजूने जात असाल तर ही तयारी नकीच पाहून या...