IAS Nikhil Desai Legal Notice For Pooja Naik: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गोमंतकीयांचे लाखो रुपये लाटणाऱ्या पूजा नाईकने अनेक धक्कादायक खुलासे केले. या खुलाशात तिने थेट राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासह काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. मात्र या अधिकाऱ्यांपैकी एक असणाऱ्या आयएएस निखिल देसाई यांना पूजाने केलेले आरोप चांगलेच झोंबल्याचे दिसत आहेत. पूजाने आपल्यावर खोटे आणि बदनामीकारक आरोप केल्याबद्दल देसाई यांनी तिला कायदेशीर नोटीस पाठवली.
पूजाने तपास यंत्रणांसमोर जबाब दिला की, मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या सांगण्यावरुन तिने निखिल देसाई आणि मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांच्यासोबत पैशाचे व्यवहार केले. पूजाच्या या थेट आरोपानंतर आयएएस अधिकारी निखिल देसाई यांनी तिच्याविरोधात कायदेशीर पाऊल उचलले. देसाई यांनी ॲडव्होकेट जोनाथन बी. जॉर्ज यांच्या माध्यमातून तिला नोटीस पाठवली.
देसाई यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये पूजा नाईकवर गंभीर आरोप केले. एक- पूजाने जाणीवपूर्वक आणि वाईट हेतूने देसाई यांच्यावर खोटे आरोप करुन त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. दोन- पूजाच्या खोट्या विधानांमुळे देसाई यांचे मोठे नुकसान झाले, ज्याची तिने भरपाई द्यावी, असे नोटीसमध्ये म्हटले. ॲडव्होकेट जॉर्ज यांनी नोटीसमध्ये स्पष्ट केले की, देसाई यांचे नाव या संपूर्ण घोटाळ्यामध्ये नाहक गोवण्यात आले. त्यांनी कोणताही गैरव्यवहार केला नाही. पूजाने केलेले सर्व आरोप निराधार आणि खोटे आहेत.
दरम्यान, या नोटीसमुळे 'नोकरी घोटाळा' प्रकरणाला आता एक नवे कायदेशीर वळण मिळाले आहे. एका बाजूला पूजा नाईक मंत्री सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांच्यावर आरोप करत आहे, तर दुसऱ्या बाजूला आयएएस अधिकारी निखिल देसाई यांनी स्वतःची प्रतिमा वाचवण्यासाठी कायदेशीर लढाई सुरु केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस आणि दक्षता युनिट करत असून, आयएएस अधिकारी देसाई यांना नोटीसद्वारे आपली बाजू स्पष्ट करुन पूजा नाईकवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.