Canacona shack drug arrest Dainik Gomantak
गोवा

Crime News: धक्कादायक! शॅक्‍सच्या नावाखाली ड्रग्जचा व्यवसाय; संशयिताकडून पोलिसाचेच घर वापरात असल्याचा संशय

Canacona shack drug arrest: काणकोणात शॅक्‍सच्या नावाखाली सर्रास अमलीपदार्थांचा व्यवहार सुरू असल्याचा जो आरोप आतापर्यंत केला जात होता त्यात तथ्य असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: काणकोणात शॅक्‍सच्या नावाखाली सर्रास अमलीपदार्थांचा व्यवहार सुरू असल्याचा जो आरोप आतापर्यंत केला जात होता त्यात तथ्य असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. काणकोण पोलिसांनी एक शॅकचालक आणि एका रेस्टॉरंट चालकाला अटक केल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

किनारपट्टी भागात ड्रग्सचा सुळसुळाट वाढला असताना मंगळवारी पहाटे काणकोण पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत देवाबाग-काणकोण येथे एकाला अटक करीत त्याच्याकडून ५.२५ लाखांचे ड्रग्स जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी चापोली-काणकोण येथे राहणाऱ्या मूळ कोची-केरळ वॉल्टर फर्नांडिस नावाच्या एका संशयिताला अटक केली होती.

त्यानंतर मंगळवारी रात्री त्याचा साथीदार सुमित मदन बांदेकर याला अटक केली होती. यावरून काणकोण येथे ड्रग्स विक्रीचे एक नेटवर्क कार्यरत असल्याचेही उघड झाले आहे. अटक केलेल्यांपैकी वॉल्टर हा मागची चार वर्षे शॅक्‍स व्यवसायात असून पाळोळे व आगोंद या दोन ठिकाणी त्याचे शॅक्‍स सुरू आहेत. त्याशिवाय काणकोणातच तो आणखी एक नाईट क्लब चालवत होता.

कालांतराने तो बंद पडला. अटक केलेल्या दुसऱ्या सुमित बांदेकरचे आगोंद येथे रेस्टॉरंट सुरू आहे. वॉल्टर हा मागची चार वर्षे चापोलीत राहत आहे. या रॅकेटमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत, अशी माहिती दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी दिली.

संशयिताकडून पोलिसाचेच घर वापरात

याप्रकरणी ज्याला अटक केली त्या वॉल्टरच्या एका जवळच्या नातेवाईकाने काणकोण पोलिसांत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचे घर भाड्याने घेतले असून मागची काही वर्षे त्याच्याकडून ते वापरात आहे. त्यामुळे या घराचा आणि संशयिताचा एकमेकांशी काही संबंध आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. यासंबंधी दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक वर्मा यांना विचारले असता, आमचा तपास सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT