Goa Cyber Crime: गुंतवणूकीतून ज्यादा परताव्याचं आमिष, गोव्यातील एकाला 67 लाखांचा गंडा; केरळच्या भामट्याला बेड्या

Goa Investment Fraud: जास्त परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना लुटणाऱ्या एकाचा गोवा सायबर सेलने पर्दाफाश केला आहे.
Goa Cyber Crime
Goa Cyber CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: जास्त परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना लुटणाऱ्या एकाचा गोवा सायबर सेलने पर्दाफाश केला आहे. करंझाळे येथील एका व्यक्तीची ६७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी अनुराज आर. (रा. तिरुवनंतपुरम, केरळ) याला अटक केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, संशयिताने एका नामांकित गुंतवणूक कंपनीचे नाव वापरून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून फिर्यादीशी संपर्क साधला होता. एका बनावट ट्रेडिंग ॲप्लिकेशनमध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठा नफा मिळेल, असे आमिष त्याने दाखवले.

आमिषाला बळी पडून करंझाळे येथील तक्रारदाराने वेळोवेळी एकूण ६७ लाख रुपये गुंतवले. मात्र, परतावा मिळण्याऐवजी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

Goa Cyber Crime
Goa Tourist Saftey: जबरदस्तीने सेल्फी अन् डान्सचा अट्टाहास, गोव्याच्या किनाऱ्यावर महिला पर्यटकांसोबत असभ्य वर्तन

सायबर पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासात असे दिसून आले की, फसवणुकीच्या रकमेपैकी २८ लाख रुपये थेट अनुराज याच्या बँक खात्यात जमा झाले होते. हे पैसे त्याने नंतर इतर अनेक बँक खात्यांमध्ये वळवले.

तपासादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. संशयिताचे हे बँक खाते केवळ गोव्यातीलच नव्हे, तर इतर चार राज्यांतील सायबर फसवणुकीच्या प्रकरणांशीही संबंधित असल्याचे आढळले आहे.

Goa Cyber Crime
Goa Education: 9वीच्‍या परीक्षेबाबत नवी अपडेट! शाळांनी प्रश्नपत्रिका काढण्याचा निर्णय स्थगित; गोवा बोर्डाकडून नवे परिपत्रक जारी

या इतर प्रकरणांमध्ये सुमारे ५४.४ लाख रुपयांच्या घोटाळ्याचा समावेश आहे. म्हणजेच, हा आरोपी एका मोठ्या सायबर नेटवर्कचा भाग असून, पोलीस आता या टोळीतील इतर सदस्यांचा शोध घेत आहेत. सायबर सेलचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, नागरिकांनी अनोळखी लिंक किंवा ॲप्सवर गुंतवणूक टाळावी, असे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com