Goa Crime: काणकोणमधील नायजेरियन कनेक्शन उघडकीस! 1.10 कोटींचे कोकेन जप्त; ड्रग्स रॅकेटचा तपास युद्धपातळीवर

Goa Drugs Case: ओनेयेचोले फ्रायडे (४७) असे अटक करण्यात आलेल्या ड्रग्स पेडलरचे नाव असून, या कारवाईमुळे काणकोण परिसरात सुरू असलेल्या ड्रग्सच्या जाळ्याचा पर्दाफाश झाला आहे.
Goa Drugs Case
Goa Drugs CaseDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: काणकोणमधील ड्रग्सप्रकरणात आंतरराष्ट्रीय नायजेरियन कनेक्शन उघडकीस आले आहे. पोलिसांनी नायजेरियातील एका इसमाला अटक करत तब्बल १ कोटी १० लाख रुपये किमतीचे कोकेन जप्त केले.

ओनेयेचोले फ्रायडे (४७) असे अटक करण्यात आलेल्या ड्रग्स पेडलरचे नाव असून, या कारवाईमुळे काणकोण परिसरात सुरू असलेल्या ड्रग्सच्या जाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. फ्रायडे याच्याकडून एकूण २१९.९ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे, त्याची बाजारभावानुसार किंमत १ कोटी ९ लाख ९५ हजार रुपये आहे.

यापूर्वी अटक करण्यात आलेल्या वॉल्टर फर्नांडिस याच्याशी या नायजेरियन संशयिताचा संबंध असल्याचा संशय पोलिसांना असून, या आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा सखोल तपास सुरू आहे. दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना वर्मा यांनी, हे अमली पदार्थ नेमके कुठून आणि कशा मार्गाने गोव्यात आणले जातात, याचा तपास सुरू असल्याचे सांगितले.

Goa Drugs Case
Cyber Crime: गुंतवणुकीच्या आमिषाने 67 लाखांची फसवणूक, केरळमधून युवकाला अटक

काणकोण पोलिसांनी मंगळवारी वॉल्टर फर्नांडिस (४९) याला अटक करून एमडीएमए, चरस व कोकेन असा एकूण ५ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. याच प्रकरणात सुमित बांदेकर (३२) यालाही अटक करण्यात आली आहे.

Goa Drugs Case
Goa Drugs Case: तपासाची चक्रे फिरली अन् 'सुसान' जाळ्यात अडकली! वार्का ड्रग्ज प्रकरणाला 'आंतरराष्ट्रीय' वळण; अमेरिकन महिलेला गोव्यात बेड्या

तो वॉल्टरकडून ड्रग्स घेत असल्याचे तपासात उघड झाले आहे. दोघांनाही पुढील चौकशीसाठी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. फ्रायडे याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्‍याला काणकोणमधील तारीर-किंदळेबाग येथील एका हॉटेलमधून अटक करण्‍यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com