CAG Of India Dainik Gomanatak
गोवा

CAG Of India: सरकारला 574 कोटींचा फटका; ‘कॅग’चे ताशेरे

खाण कंपनीला नियमबाह्यपणे मुदतवाढ; अहवालांचीही दखल नाहीच!

गोमन्तक डिजिटल टीम

CAG Of India एका खाण कंपनीने कंत्राटानुसार खनिज मालाची उचल केलीच नाही. तरीही खाण खात्याने त्या कंपनीला नियमबाह्य पद्धतीने मुदतवाढ दिली. अनियमितपणे पैसे परत केले. त्यामुळे सरकारला ५७४ कोटी रुपयांचा फटका बसल्याचे निरीक्षण महानियंत्रक महालेखापालांनी आपल्या अहवालात नोंदवले आहे.

अशा अहवालांची दखल घेतली जात नसल्याने स्वतंत्र टिप्पणी महानियंत्रक, महालेखापालांनी आपल्या अहवालात केली आहे.

बुडत्याचा पाय खोलात

२ कोटी ३९ लाख : गोवा पोलिसांनी केंद्र सरकारला वेळेत स्पेक्र्टम शुल्क भरले नाही, म्हणून विलंबित शुल्क भरावे लागले. हे विलंबित शुल्क २ कोटी ३९ लाख रुपये होते.

३ कोटी ७५ लाख : एका पायाभूत सुविधा कंपनीला कमी दराने व्हॅट आकारला. जास्त परतावा दिला. त्यामुळे ३ कोटी ७५ लाखांचे नुकसान झाले.

१८ लाख : अबकारी खात्याने सांगे, पेडणे, केपे, काणकोणमध्ये मद्यविक्री परवानाधारकांना चुकीच्या पद्धतीने व्याज आकारल्याने १८ लाखांचे नुकसान झाले.

१ कोटी ९ लाख : नगरनियोजन खात्याने अनुदानासाठीची रक्कम बॅंकेच्या चालू खात्यात ठेवली. त्यामुळे व्याजावर १ कोटी ९ लाख रुपयांचे नुकसान झाले.

६ कोटी ५० लाख : वाणिज्य कर खात्यात वेगवेगळ्या ७ प्रकरणांत कमी दराने व्याज आकारणी केली. त्यामुळे ६ कोटी ५० लाखांचे नुकसान झाले.

हलगर्जीपणा

महालेखापालांनी म्हटले आहे की, जून २०२१ पर्यंत ७२१ तपासणी अहवालांवर खात्यांनी पूर्तता अहवाल सादर केलेला नाही. ५ अहवालांवर खात्यांचे म्हणणे हवे होते, त्याला खात्यांनी उत्तरच दिलेले नाही. कॅग अहवालावर खात्यांनी ३ महिन्यांत स्पष्टीकरण द्यायचे असते. २०१५ ते २०२२ पर्यंत ९ खात्यांनी १३ अहवालांवर स्पष्टीकरण दिलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nora Fatehi Accident: नोरा फतेहीच्या कारला जोरदार धडक; अभिनेत्रीच्या डोक्याला दुखापत, मद्यधुंद चालकाचा हैदोस!

IRCTC Tour Package: नव्या वर्षाचं सेलिब्रेशन गोव्यात! 'आयआरसीटीसी'ने आणलंय स्वस्त आणि मस्त टूर पॅकेज; लगेच करा बुकिंग

Super Sunday! आशिया कपसाठी भारत-पाकिस्तानमध्ये 'कांटे की टक्कर', कधी अन् कुठे पाहता येणार अंतिम सामना? जाणून घ्या

Eggs Cancer Rumour: अंडी खाणं 100% सुरक्षित, कॅन्सरच्या अफवांवर विश्वास ठेवू नका; 'FSSAI'चं स्पष्टीकरण

गोवा, कोकण भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाया घालणाऱ्या दुर्गानंद नाडकर्णी यांचे निधन; मुख्यमंत्र्यांनी अर्पण केली श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT