Vacant Teacher Post: सरकारी शाळांबाबत महत्वाची बातमी! अजूनही शिक्षकांची 671 पदे रिक्त

Goa Government School Teacher Vacant Post: राज्‍यातील सरकारी प्राथमिक, माध्‍यमिक आणि उच्च माध्‍यमिक शाळांमध्‍ये आतापर्यंत २,७९९ शिक्षकांची पदे मंजूर झालेली होती.
671 teacher vacancies in goa schools
671 teacher vacancies in goa schoolsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्‍यातील सरकारी प्राथमिक, माध्‍यमिक आणि उच्च माध्‍यमिक शाळांमध्‍ये आतापर्यंत २,७९९ शिक्षकांची पदे मंजूर झालेली होती. तरीही सद्यस्‍थितीत ६७१ शिक्षकांची पदे रिक्त असल्‍याचे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेतील लेखी प्रश्‍‍नाच्‍या उत्तरातून सादर केलेल्‍या आकडेवारीतून समोर आले आहे.

आमदार विजय सरदेसाई यांनी याबाबतचा प्रश्‍‍न विचारला होता. एनईपी अंमलबजावणीसाठी किती शिक्षकांना प्रशिक्षण देण्‍यात आले? याबाबतही त्यांनी विचारणा केली.

671 teacher vacancies in goa schools
Goa Education: महिलांसाठी 'मुख्यमंत्री उडान भरारी'ची मोठी घोषणा, मुलींना शाळेतच मिळणार सॅनिटरी पॅड! वाचा अर्थसंकल्पातील 4 महत्त्वाचे निर्णय

‘एनईपी’च्‍या अंमलबजावणीसाठी आतापर्यंत सुमारे ४० हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्‍यात आलेले आहे. गोवा लोकसेवा आयोगामार्फत शिक्षकांची १११ रिक्त पदे भरण्‍याची प्रक्रिया सुरू आहे. तर, कर्मचारी भरती आयोगाकडे आयोगाने शिक्षण ११३ शिक्षकांच्‍या भरतीसाठीचे प्रस्‍ताव सादर करण्‍यात आले आहेत, असेही मुख्‍यमंत्र्यांनी उत्तरात म्‍हटले आहे.

671 teacher vacancies in goa schools
Goa Education: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! गोव्यात लागू होणार ‘त्रिसूत्री भाषा’ पद्धत; ‘नापास नाही’ पद्धत राहणार कायम

राज्यात दररोज ४७ जन्म, ४२ मृत्यू

राज्‍यात दररोज सरासरी ४७ जणांचा जन्‍म आणि ४२ जणांचा मृत्‍यू होत असल्‍याचे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेतील लेखी प्रश्‍‍नाच्‍या उत्तरातून समोर आलेले आहे. आमदार एल्‍टन डिकॉस्टा यांनी याबाबतचा प्रश्‍‍न विचारला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com