Mirabag: आंदोलनस्थळीच महिलादिन साजरा! मीराबागमध्ये महिलांनी कापला केक; आगळेवेगळे सेलिब्रेशन चर्चेत

Mirabag Womens Day: मीराबाग बंधाऱ्याविरोधात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनस्थळी महिलांनी यंदाचा महिला दिन आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला.
Mirabag Womens Day
Mirabag Womens DayDainik Gomantak
Published on
Updated on

सांगे: मीराबाग बंधाऱ्याविरोधात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनस्थळी महिलांनी यंदाचा महिला दिन आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला. प्रदेश काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस तसेच उसगाव ग्रामपंचायत पंच सदस्य मनीषा उसगावकर यांच्या उपस्थितीत आंदोलनस्थळी केक कापून तसेच सहभागी महिलांना गुलाब पुष्प भेट दिली. यावेळी आंदोलनात सहभागी महिला तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना मनीषा उसगावकर म्हणाल्या की, देव-धर्माच्या नावावर मते मागणारे सत्ताधारी निवडणुकीत पैसा गोळा करण्यासाठी जनतेला तसेच देवस्थानांनाही पाण्यात बुडवण्यास मागे-पुढे पाहणार नाहीत.

Mirabag Womens Day
Mirabag: 'आंदोलनकर्त्यांचा संयम सुटू लागलाय'! LOP आलेमाव यांचा इशारा; मुख्‍यमंत्र्यांना केले भेट देण्याचे आवाहन

बंधाऱ्याच्या या प्रकल्पामुळे स्थानिकांच्या भावना दुखावल्या जात असून जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. जे पुढारी स्वतःच्या कार्यकर्त्यांनाच आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना मीराबागची जनता योग्य धडा शिकविल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. हा महिला दिन माझ्या आयुष्यातील सर्वात स्मरणीय दिवस ठरल्याचेही त्या म्हणाल्या.

Mirabag Womens Day
Mirabag: विधानसभेत घोषणाबाजी करणाऱ्या त्या आंदोलकांना जामीन, Video

संगमेश्वर तिरावर सभा

मीराबाग बंधाऱ्याला विरोध दर्शविण्यासाठी तसेच धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगेवासीयांनी सोमवारी सायंकाळी ३ वाजता संगमेश्वर तिरावर विशेष सभेचे आयोजन केले आहे. श्री संगमेश्वर देवस्थानचे अध्यक्ष सुप्रज तारी यांनी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सांगेवासीयांना केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com