Egg price hike in Maharashtra Dainik Gomantak
गोवा

Egg Price Hike: 'ब्रॉयलर' अंडी खाऊ लागली भाव; 90 रुपये डझनने विक्री, 5 महिन्यांनंतर दरवाढ; उकाड्याचा परिणाम

Goa Broiler Egg Price Hike: मासळी आणि ब्रॉयलर चिकनच्या वाढत्या दरांनंतर आता ब्रॉयलर अंड्यांचे भावही पुन्हा वाढू लागल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: मासळी आणि ब्रॉयलर चिकनच्या वाढत्या दरांनंतर आता ब्रॉयलर अंड्यांचे भावही पुन्हा वाढू लागल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अंड्यांना असलेली वाढती मागणी आणि सध्याचा तुटवडा लक्षात घेता आगामी काळात दर आणखी वाढण्याची शक्यता अंडी विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

डिचोली बाजारात प्रामुख्याने कर्नाटक राज्यातून ब्रॉयलर अंड्यांची मोठ्या प्रमाणावर आवक होते. सध्या अंड्यांचा पुरवठा सुरू असला तरी पूर्वीच्या तुलनेत त्याचे प्रमाण घटले आहे. उकाडा, वाढते तापमान आणि असंतुलित हवामान यामुळे अंडी लवकर खराब होत असल्याने बाजारातील उपलब्धता कमी झाली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी व्यापाऱ्यांनी दरात वाढ केल्याची माहिती मिळाली आहे.

सध्या मासेमारी बंदीकाळ सुरू असल्याने मासळीचे दर वाढले आहेत. दुसरीकडे ब्रॉयलर चिकनही महाग झाले आहे. त्यामुळे अनेक ग्राहक अंड्ड्यांना प्राधान्‍य देत आहेत.

६८० रुपयांना १०० अंडी

गेल्या एप्रिल महिन्यापासून ब्रॉयलर अंड्यांचा घाऊक दर शंभर अंड्यांमागे ५०० रुपये होता. त्यानंतर तो वाढून ६०० रुपयांपर्यंत पोहोचला आणि आता ६८० रुपये झाला आहे. यापूर्वी पाच महिन्यांपूर्वी शंभर अंड्यांचा दर ६९० रुपयांपर्यंत गेला होता. एप्रिलमध्ये मात्र दरात मोठी घसरण होऊन शंभर अंड्यांमागे तब्बल १९० रुपयांची घट झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT