Goa Weather Update: पावसाची दडी अन् उन्हाचा चटका; बळीराजाच्या चिंतेत दिवसागणिक भर!

Goa Monsoon: मान्सूनचे आगमन झाले म्हणतोय तोच मृग नक्षत्राने ओढ दिली. जून महिन्याचा मध्य सरला तरी पाऊस अद्याप सक्रिय होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
monsoon delay in Goa
monsoon delay in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मान्सूनचे आगमन झाले म्हणतोय तोच मृग नक्षत्राने ओढ दिली. जून महिन्याचा मध्य सरला तरी पाऊस अद्याप सक्रिय होण्याची चिन्हे दिसत नाहीत. हवामान खात्याकडूनही सुमारे २० तारखेपर्यंत पावसाची विशेष चिन्हे दिसत नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. पाऊस लांबल्याने खरीप हंगामाची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

राज्यात मान्सूनचे आगमनही अत्यंत सावधपणे झाल्यासारखे झाले. एल निनोच्या प्रभावाचा यंदाही परिणाम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. या परिणामामुळे पाऊस लांबला असून, अजूनही उन्हाचा चटका जाणवत आहे. पावसाळा सुरू होणार म्हणून एका बाजूला नागरिकांनी रेनकोट व छत्र्यांची खरेदी केली; मात्र हे साहित्य अद्याप विनावापर घरातच ठेवावे लागले आहे.

monsoon delay in Goa
Goa Politics: आप कार्यकर्त्यांनी फोंड्यात मगोपला दाखविले काळे झेंडे, शाब्दिक चकमक; काही काळ तणावाचे वातावरण

राज्यात पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी वर्गाने मान्सूनपूर्व शेतीची कामे पूर्ण करून पावसाची प्रतीक्षा सुरू ठेवली आहे. हे चित्र केवळ गोव्यापुरते मर्यादित नसून, देशातील अनेक राज्यांतही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.

monsoon delay in Goa
Goa Road Accidents: बेफाम वेगाचे चार बळी, रविवारी चार ठिकाणी रस्‍ते अपघात; साडेपाच महिन्‍यांत 116 जणांचा मृत्‍यू

दक्षिणेतील काही राज्यांत पाऊस पडत असला तरी तेथील ढग पुढे सरकत नसल्याने पाऊस सक्रिय होण्यास विलंब होत असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, पावसाने ओढ दिल्याने अनेक ठिकाणी घरांच्या दुरुस्तीची कामे करण्याकडे नागरिकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com