Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

Shani Dev Vakri Chal 2026 Astrological Prediction: ज्योतिष शास्त्रात न्यायाची देवता आणि कर्मफळदाते मानले जाणारे शनिदेव जुलै महिन्यात आपली चाल बदलणार आहेत.
Shani Dev Vakri Chal 2026 Astrological Prediction
Shani Vakri Dainik Gomantak
Published on
Updated on

Shani Dev Vakri Chal 2026 Astrological Prediction: ज्योतिष शास्त्रात न्यायाची देवता आणि कर्मफळदाते मानले जाणारे शनिदेव जुलै महिन्यात आपली चाल बदलणार आहेत. 26 आणि 27 जुलै च्या मध्यरात्री 1 वाजून 25 मिनिटांनी शनिदेव मीन राशीत वक्री होणार आहेत. शनीची ही वक्री म्हणजेच उलटी चाल तब्बल 11 डिसेंबरपर्यंत कायम राहणार आहे.

11 डिसेंबर रोजी शुक्रवारी शनिदेव पुन्हा मार्गी होतील. तब्बल पाच महिने शनीच्या या वक्री अवस्थेमुळे सर्व 12 राशींच्या जीवनावर मोठा प्रभाव दिसून येणार असला, तरी सिंह आणि कुंभ या दोन राशींसाठी हा काळ अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक ठरणार आहे. या दोन्ही राशींना राहु-केतुच्या सोबतच शनीच्या अशुभ प्रभावाचा दुहेरी फटका सहन करावा लागू शकतो.

Shani Dev Vakri Chal 2026 Astrological Prediction
Horoscope: शनीची उलटी चाल ठरणार निर्णायक! 'या' राशींवर पैशांचा वर्षाव, तर काहींना होऊ शकतो आर्थिक फटका

सिंह राशीबद्दल बोलायचे झाल्यास, सध्या या राशीवर शनीच्या अडीचकीचा प्रभाव सुरु आहे. त्यातच सिंह राशीत केतू ग्रह विराजमान आहे. अशा स्थितीत शनी वक्री झाल्यामुळे सिंह राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये (Career) प्रचंड मानसिक ताण-तणाव वाढण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यापाराच्या क्षेत्रात नवनवीन अडचणी निर्माण होऊ शकतात. आर्थिक बाबतीत मोठ्या संकटांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या कालावधीत वादविवादांपासून लांब राहणे आणि कोणताही महत्त्वाचा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेणे हितकारक ठरेल.

Shani Dev Vakri Chal 2026 Astrological Prediction
Horoscope: गुरुवारचा दिवस ठरणार भाग्यवान! श्रीविष्णूंच्या विशेष कृपेने या 3 राशींना नोकरीत मोठे यश, धनलाभाचेही प्रबळ योग

दुसऱ्या बाजूला, कुंभ राशीच्या लोकांवर सध्या शनीच्या साडेसातीचा तिसरा आणि अंतिम टप्पा सुरु आहे. सध्या कुंभ राशीत राहु ग्रहाचे वास्तव्य आहे. शनी वक्री झाल्यामुळे कुंभ राशीच्या जातकांना राहु आणि शनी या दोन्ही पापग्रहांचे अशुभ परिणाम सोसावे लागतील. घाईगडबडीत किंवा कोणत्याही मोहात पडून केलेली कोणतीही गुंतवणूक मोठ्या आर्थिक नुकसानाला कारणीभूत ठरु शकते. म्हणूनच कुंभ राशीच्या लोकांनी या काळात कोणतेही काम करताना योग्य नियोजन आणि संयम बाळगणे अत्यंत गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com