Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Hannah Arendt Political Philosophy: हिंसा तिथे वापरली जाते, जिथे सत्ता कमकुवत किंवा कमअस्सल असते
Hannah Arendt Political Philosophy
Hannah Arendt On ViolenceDainik Gomantak
Published on
Updated on

डॉ. मुकुल पै रायतुरकर

हिंसा तिथे वापरली जाते, जिथे सत्ता कमकुवत किंवा कमअस्सल असते. हिंसा हे ताकदीचे नाही तर कमकुवतपणाचे लक्षण आहे. एखादे सरकार नियंत्रण ठेवण्यासाठी हिंसेचा वापर करत असेल, तर त्यांच्याकडे नैतिक अधिकारांची कमतरता आहे हे सिद्ध होते.

जच्या बदलत्या आणि आगामी राजकीय परिस्थितीचा विचार केला, तर राजकीय तत्त्वज्ञ ‘हॅना आरेन्ट’ यांचे विचार आजही मार्गदर्शक ठरतात. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर आजच्या काळात त्या अधिक प्रासंगिक वाटू लागल्या आहेत. आजच्या लोकशाही देशांमधील आव्हाने असोत किंवा हुकूमशाही राजवटी, आरेन्ट यांचे विचार या सर्वांवर अचूक प्रकाश टाकतात.

Hannah Arendt Political Philosophy
Goa Opinion: निवडणुकीच्या काळात लोकांना मोठमोठी 'आश्वासने' दिली जातात, नंतर त्या आश्वासनांची 'पूर्तता' कितपत होते?

दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा जगाला ‘होलोकॉस्ट’ (ज्यू संहार) च्या भीषणतेची जाणीव झाली, तेव्हा आरेन्ट यांच्या लेखनाला सुरुवात झाली. १९५१ मध्ये त्यांनी ‘द ओरिजिन्स ऑफ टोटॅलिटेरियनिझम’ हा ग्रंथ लिहिला. हुकूमशाही राजवटी कशा उदयाला येतात आणि त्या माणसाचा स्वतंत्र विचार कसा नष्ट करतात, याचे विश्लेषण त्यांनी यात केले. त्यांच्या मते, अडॉल्फ हिटलर आणि जोसेफ स्टालिन यांच्या विचारसरणीत कमालीचे साम्य होते.

१९६३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘आयशमन इन जेरुसलेम’ या पुस्तकात त्यांनी एक कडक भूमिका मांडली; ‘कोणालाही फक्त आज्ञा पाळण्याचा अधिकार नाही.’ याचा अर्थ असा की, वरून आदेश आले तरी आपल्या कृत्याची नैतिक जबाबदारी ही त्या व्यक्तीची स्वतःचीच असते. दुसऱ्या महायुद्धात ज्यूंना छळछावणीत पाठवणाऱ्या अडॉल्फ आयशमनला इस्रायली एजंट्सनी अर्जेंटिनामध्ये पकडले आणि १९६१ मध्ये जेरुसलेममध्ये त्याच्यावर खटला चालवला.

Hannah Arendt Political Philosophy
Goa Opinion: ‘प्रभु व्हायोलेटा’ प्रकरणातून निर्माण झालेले नवे प्रश्न

या खटल्यादरम्यान आयशमनच्या वागणुकीवरून आरेन्ट यांनी ‘द बॅनॅलिटी ऑफ इव्हिल’ (दुष्टतेचे सामान्यीकरण) ही प्रसिद्ध संकल्पना मांडली. त्यांच्या मते, आयशमन हा कोणी अवाढव्य राक्षस नव्हता, तर तो एक सामान्य सरकारी अधिकारी होता; ज्याने आपल्या कृत्यांच्या भीषण परिणामांचा आणि नैतिकतेचा स्वतंत्रपणे विचारच केला नाही. ‘मी फक्त वरिष्ठांच्या आदेशांचे पालन करत होतो,’ हा आयशमनचा बचाव आरेन्ट यांनी फेटाळून लावला.

स्वातंत्र्य आणि माणुसकी टिकवून ठेवण्यासाठी अंधानुकरण नाकारणे आणि स्वतःची विवेकबुद्धी वापरणे अत्यंत गरजेचे आहे, असे आरेन्ट मानत. हाच विचार अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या विधानाशी जोडला जातो, ज्यांनी म्हटले होते की, ‘सत्तेचे अंधानुकरण हा सत्याचा सर्वात मोठा शत्रू आहे.’ आरेन्ट यांच्या तत्त्वज्ञानाचा कळस म्हणजे १९७८ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेले ‘द लाइफ ऑफ द माइंड’ हे पुस्तक. विचार प्रक्रिया, विवेक आणि नैतिक जबाबदारी यांच्यातील संबंधांचा हा सखोल अभ्यास आहे.

Hannah Arendt Political Philosophy
Opinion: 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मात्र चपखल नियोजन केल्याचे दिसते; राजकीय अस्थिरतेचा दुसरा अंक

चिकित्सक विचार पद्धतीच माणसाला नैतिक पतनापासून वाचवू शकते, हे त्यांनी यात स्पष्ट केले. त्या म्हणतात, ‘विचार करण्याला स्वतःचे एक नैतिक मूल्य असते... जगात बहुतांश वाईट गोष्टी अशा लोकांकडून घडतात, जे कधीच चांगले किंवा वाईट यापैकी एकाची ठाम निवड करू शकत नाहीत.’त्यांचे ‘ऑन रेव्होल्युशन’ हे पुस्तक इतिहास आणि राजकीय सिद्धांताचा एक उत्तम मिलाफ आहे.

क्रांतीचा हेतू केवळ सामाजिक किंवा आर्थिक बदल घडवणे हा नसून, असे सार्वजनिक व्यासपीठ किंवा स्वातंत्र्य निर्माण करणे हा असावा, जिथे नागरिक राजकीय भविष्य स्वतः घडवू शकतील. परंतु,‘सत्ता हातात आल्यानंतर समाज बदलण्याऐवजी ती सत्ता टिकवणे हेच राज्यकर्त्यांचे मुख्य ध्येय बनते,’ अशी खंतही त्यांनी मांडली.

Hannah Arendt Political Philosophy
Opinion: भारतातील शहरांना भविष्यात अधिकाधिक पाण्याची गरज भासणार आहे, पण आपण ही मागणी पूर्ण करू शकू का?

त्यांचे ‘ऑन व्हायोलन्स’ हे आणखी एक उत्कृष्ट पुस्तक. विसाव्या शतकातील युद्धे, क्रांत्या आणि हुकूमशाहीच्या संदर्भात त्यांनी हिंसेच्या स्वरूपाचे विश्लेषण केले. ‘हिंसा म्हणजेच सत्ता किंवा अधिकार’ हा सामान्यांचा समज त्यांनी खोडून काढला. त्यांच्या मते, सत्ता व हिंसा या परस्परविरोधी आहेत. खरी सत्ता ही जनतेच्या सामूहिक संमतीतून निर्माण होते; तर हिंसा तिथे वापरली जाते जिथे सत्ता कमकुवत वा कमअस्सल असते. हिंसा हे ताकदीचे नाही तर कमकुवतपणाचे लक्षण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com