Milind Naik | Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: भाजपकडून लोकसभेसाठी धक्‍कातंत्राचा वापर शक्‍य

Goa BJP: आमोणकरांचे प्रमोशन मिलिंद नाईक यांना रुचलेले नाही.

दैनिक गोमन्तक

Goa BJP: भाजपाम‍ये सध्‍या सत्तेचे गणीत बदलले आहे. लोकसभा निवडणुकीच्‍या दृष्‍टीने पक्षाचे नेते सावध पावले टाकत असून, सामाजिक पातळीवरील ज्ञातीनिहाय अंदाज घेऊन नीती ठरवण्‍यात येत आहे. त्‍यात धक्‍कातंत्राचा वापरही होऊ शकतो.

सध्‍याच्‍या बदललेल्‍या परिस्‍थितीत संघाच्‍या दबावातून लवकरच आमदार आमोणकर यांच्‍या रूपात मंत्रिमंडळात नव्‍या सदस्‍याचा समावेश केला जाणार असून, महामंडळांचे वाटपही लवकर होऊ शकते. हा निर्णय माजी आमदार मिलिंद नाईक यांना मात्र रुचलेला नाही.

सूत्रांच्‍या माहितीप्रमाणे, गेल्‍या शुक्रवारी मुख्‍यमंत्री सावंत व भाजप प्रदेशाध्‍यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्‍या पुढाकाराने वास्‍कोमधील ज्‍येष्‍ठ भाजप पदाधिकाऱ्यांची एक बैठक पणजीमध्ये झाली. यावेळी मुरगाव पालिकेचे नगराध्‍यक्ष लियो रॉड्रिग्‍ज यांच्‍यासह नगरसेवक व इतर 40 नेते उपस्‍थित होते.

आमदार संकल्‍प आमोणकर बैठकीला उपस्‍थित झाल्‍यास आपण तेथे नसू, अशी भूमिका माजी मंत्री मिलिंद नाईक यांनी जाहीर केल्‍यामुळे सुरुवातीला आमोणकर यांना बैठकीपासून दूर ठेवण्‍यात आले होते. नवीन आमदार पक्षाला लाभले असले तरी आता आमची कामे केली जावीत, असा सूर बहुतेक नेत्‍यांनी या बैठकीत मुख्‍यमंत्री व पक्षाध्‍यक्षांसमोर व्‍यक्‍त केला.

आमदाराला त्‍यांची मते ऐकविण्‍यासाठी बैठकीत बोलाविण्‍यात आले असता मिलिंद नाईक यांनी सभात्‍याग केला. माहितगारांच्‍या सूत्रांनुसार, मिलिंद उठून गेले तरी इतर कोणीही नेत्‍याने ( त्‍यात लिओ रॉड्रिग्‍ज यांचाही समावेश आहे, जे मिलिंद नाईक यांचे खंदे समर्थक मानले जातात) सभात्‍याग केला नाही. बैठकीला संकल्‍प आमोणकर यांनीही संबोधन केले व आपले सर्वांशी छान संबंध असल्‍याचे बोलून दाखवले.

वास्‍कोमधील कार्यकर्त्यांबरोबर मिलिंद नाईक यांची दिलजमाई घडवून आणण्‍याचा हा कार्यक्रम असला तरी या बैठकीचा मुख्‍य उद्देश आमोणकर यांना मंत्रिपद देण्‍याची शक्‍यता अजमावून पाहाणे होता. पक्षाच्‍या ‘थिंकटँक’लाही हळर्णकरना डच्‍चू दिल्‍यास त्‍यांच्‍या जागी संकल्‍प आमोणकर यांनाच मंत्रिपद मिळावे, असे वाटत असल्‍याने या बैठकीचा एकूण नूरच तसा ठेवण्‍यात आला.

ज्ञातीनिहाय गणिते, वास्‍तव, भविष्‍याचा वेध ...

  • सध्‍या भाजपामध्‍ये भंडारी समाजाचे केवळ तीन आमदार आहेत, तर मराठा समाजाचे कधी नव्‍हे ते सात जण जिंकून आले आहेत. मराठ्यांपेक्षा तीन पटीने अधिक असलेल्‍या भंडारी समाजाचा भाजपातील टक्‍का घसरण्‍याची ही पहिलीच वेळ आहे.

  • ख्रिस्‍ती समाजाबद्दल फारशा अपेक्षा न बाळगण्‍याचे धोरण तयार केले जात असून, संघाच्‍या दबावातून ही नीती आम्‍हाला स्‍वीकारावी लागत असल्‍याची साळसूद भूमिका पक्षाचे काही नेते घेऊ लागले आहेत.

  • वास्‍तविक, संकल्‍प आमोणकर यांना लोकसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या मंत्रिमंडळाच्‍या फेररचनेत मंत्री बनवण्‍याचा शब्‍द मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्‍यांना भाजपात येताना दिला होता. त्‍यावेळी मंत्रिमंडळातील दोन किंवा तीन सदस्‍य वगळले जाऊ शकतील.

  • संघाच्‍या दबावातून मंत्रिमंडळात एका सदस्‍य समावेश करतानाच महामंडळांचे वाटप लवकर होऊ शकते. पंतप्रधानांच्‍या गोवा भेटीत मुख्‍यमंत्री त्‍यांच्‍याबरोबर हेलिकॉप्‍टरने प्रवास करणार असून, त्‍यांना या बदलाचे सुतोवाच केले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT