Goa Hospital
Goa HospitalDainik Gomantak

Narendra Modi: मोपा विमानतळासह 'आयुष' हॉस्पिटल देखील उद्‌घाटनास सज्ज

Narendra Modi: 11 डिसेंबरला आयुष हॉस्पिटलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‍घाटन होणार आहे.

Goa Hospital: पेडणे तालुक्याला आयुष इस्पितळामुळे मोठा रोजगार उपलब्ध होणार असून आरोग्यविषयक सुविधाही मिळणार आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मुख्यमंत्र्यासोबत आमदार प्रवीण आर्लेकर, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे उपसंचालक उमेश तगाडे, हॉस्पिटलच्या सुजाता कदम, समन्वयक प्रमोद यादव, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे अधिकारी, हॉस्पिटलचे महाप्रबंधक अमित जैन, सुधाकर लंगडे, स्नेहलता नामदेवराव नहारे, स्थापत्य अभियंता व एमबीसीसी गोवाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

11 डिसेंबरला आयुष इस्पितळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‍घाटन होणार आहे. या पाश्वर्भूमीवर आयुष इस्पितळाची आज मुख्यमंत्र्यांनी इस्पितळाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. हॉस्पिटलच्या डीननी हॉस्पिटलबाबत संपूर्ण माहिती दिली. तसेच विविध विभाग दाखवले.

मुख्यमंत्री म्हणाले, 320 करोड रुपये खर्चून सुमारे 50 एकर जमिनीत हा प्रकल्प उभा करताना आरोग्याबरोबरच रोजगाराचासुद्धा प्रश्न कसा सुटेल? याची काळजी सरकारने घेतली आहे.go

Goa Hospital
Goa Petrol-Diesel Price : गोव्यातील इंधनाच्या दरात किरकोळ वाढ; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

वैद्यकीय शिक्षणाची सोय

या हॉस्पिटलमध्ये विविध सुविधा सुरू करण्यात येणार आहेत. त्यानुसार कर्मचारी भरतीही केली जाईल. हे केवळ हॉस्पिटल नाही, येथे विद्यार्थ्यांनी शिकवलेही जाणार आहे. विविध वैद्यकीय शिक्षणाची सोयही येथे होणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आज मी फक्त काम कसे चालले आहे, हे पहाण्यासाठीच आलो होतो. येत्या 11 डिसेंबर रोजी हा प्रकल्प पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com