CM Pramod Sawant And LOP Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'बालक' टीकेला 'पप्पू'ने उत्तर; गोव्यात भाजप काँग्रेस नेत्यांचे एक्सवर व्हर्बल वॉर

Goa BJP Congress Social post War: विधानसभा अधिवेशन काही दिवसांवर येऊन ठेपले असताना राज्यातील भाजप-काँग्रेस नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत.

Pramod Yadav

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पाच दिवसांवर येऊन ठेपले आहे. सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षातील आमदार सज्ज झाले असून, विविध विषयांवरुन सत्ताधारी भाजपला प्रश्न विचारण्यास सुरुवात केलीय.

सत्ताधारी आमदारांनी देखील विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्याचा दाखला देत भाजप सरकार फेल ठरल्याचा दावा युरी आलेमाव यांनी केला. यावरुन भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसत असून, एक्सवर व्हर्बल वॉर रंगले आहे.

राज्यातील 40 आमदारांपैकी 12 मंत्री आणि 1 सभापती आहेत. सात विरोधी आमदारांसोबत, सरकारबरोबर असलेले 20 आमदारही विधानसभेत प्रश्न मांडून सरकारला जाब विचारत आहेत. यावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील गोव्यातील भाजप सरकारचा कारभार पूर्णपणे कोलमडला असल्याचे स्पष्ट होते, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले.

याला भाजप प्रवक्ते सावियो रॉड्रिग्ज यांनी उत्तर देताना युरी आलेमाव यांना बालक म्हणून संबोधले. गोव्याच्या पप्पूला सांगायचे आहे की सत्तेत असले तरी आमदार म्हणून त्यांना सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. यालाच लोकशाही म्हणतात. काँग्रेस नेत्यांना संविधान दाखवता येते पण ते वाचण्याचे हे लोक कष्ट घेत नाहीत, असे रॉड्रिग्ज यांनी म्हटले.

याला प्रत्युत्तर म्हणून, काँग्रेस सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष दिव्या कुमार यांनी पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना "पप्पू" संबोधल्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

राष्ट्रीय महामार्ग 66 वर दरड कोसळल्याने महामार्गावरील दोन्ही लेन वाहतुकीसाठी बंद झाल्या यावरुन काँग्रेस नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

"अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला, एन- 66 वर दरड कोसळणे सुरूच आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबत मौन बाळगले आहे. ते किंवा कोणीही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळाला भेट देत नाहीत किंवा कंत्राटदारावर कोणतीही कारवाई करत नाहीत. भाजपच्या जावयांला खास वागणूक, त्रस्त जनतेसाठी काहीही नाही," असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: बाहेरच्या लोकांमुळे 'सुशेगाद' गोव्याची शांतता भंग! गोमंतकीयांना RG-गोवा फॉरवर्डच्या युतीत दिसतोय 'आशेचा किरण'

Senior T20 cricket: गोव्याच्या महिलांची विजयी सलामी, सीनियर टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडला 13 धावांनी नमविले

Goa Politics: खरी कुजबुज, मिकीचा 'सोशल ॲक्‍टिविस्‍ट'शी पंगा

सिलिंग फॅन तुटून विद्यार्थीनीच्या अंगावर पडला, पर्ये – सत्तरी सरकारी शाळेतील चौथीची विद्यार्थीनी जखमी

Goa Live News: गांजा बाळगल्याप्रकरणी मडगाव पोलिसांकडून दोघांना अटक

SCROLL FOR NEXT