रायबंदर येथील फेरी बोटीतून दीवाडी बेटावर उतरल्यानंतर समोरच असणारे डेरेदार आंब्याचे वृक्ष स्वागताला सज्ज आसायचे. पण, आता हा नजारा दिसणार नाही. कारण गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या पावासात शंभर वर्षापूर्वीच्या झाडाचा देखील बळी गेला आहे.
बेटावर येणाऱ्या सर्वच पर्यटकांसाठी विसाव्याचे आणि सुंदर फोटो घेण्याचे ठिकाण होते. झाड कोसळल्याने गावकऱ्यांचेच नव्हे तर अनेक निसर्गप्रेमींचे देखील डोळे पाणावले आहेत.
निसर्गसंपन्न अशी ओळख असणाऱ्या गोव्यात अनेक सुंदर आणि डेरेदार वृक्ष पाहायला मिळतील. रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या माडांच्या झाडांमुळे प्रसिद्ध असलेला पर्रा रोड असो की सांतिनेज येथे स्मार्ट सिटीच्या कामासाठी हटविण्यात आलेले वडाचे झाड असो.
गोवेकर निसर्गाबाबत संवेदनशील आहेत हे नक्की पण नैसर्गिक दुर्घटनांपुढे अनेकवेळा माणूस हतबल होतो. शंभर वर्षापूर्वी पासून या भागाचे सौंदर्य वाढवणारे झाड पावसाच्या तडाख्यात उन्मळून पडल्याने गावकरी भावनिक झाले.
पर्यटकांसह स्थानिकांसाठी हे हक्काचे विसाव्याचे स्थान होते. याशिवाय फोटो काढण्यासाठी देखील अनेकजण याठिकाणी भेट देत होते.
सुर्यास्तावेळी या झाडामुळे परिसरातील सौंदर्यात आणखी भर पडत होती. बॉलिवूडला देखील या झाडाची भूरळ पडली आणि दीपिका, अर्जुन कपूरची भूमिका असणाऱ्या फाईंडिंग फॅनी चित्रपटीचे चित्रीकरण देखील या झाडाजवळ झाले होते. सिनेमात दीपिका आणि अर्जुन या झाडाखाली बसल्याचे एका सीनमध्ये दिसून येते.
झाड पुन्हा जगू शकते का याबाबत देखील गावकऱ्यांनी खल काढला मात्र, ते खोडातच मोडून पडल्याने ते पुन्हा जगणे शक्य नसल्याचे पर्यावरण तज्ञांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.