BJP Election Campaign Dainik Gomantak
गोवा

BJP Election Campaign: कुणी मध्यप्रदेशात तर कुणी ग्वाल्हेरमध्ये करताहेत दौरे, राज्याचे मंत्री-आमदार प्रचारात व्यस्त

मध्यप्रदेशात भाजपचा प्रचार : मुख्यमंत्र्यांची ग्वाल्हेरमध्ये पदयात्रा

गोमन्तक डिजिटल टीम

BJP Election Campaign मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे मध्यप्रदेशातील प्रचारात, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद शेट तानावडे तेलंगणामधील प्रचारात, भाजपचे आमदार तेलंगणामधील प्रचारात असे चित्र येत्या काळात दिसल्यास नवल वाटू नये.

सध्याच मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री मध्यप्रदेशात असून येत्या दोन दिवसांत तानावडे तिसऱ्यांदा तेलंगणाचा दौरा करणार आहेत. याआधी उल्हास नाईक तुयेकर, दाजी साळकर, संकल्प आमोणकर, केदार नाईक आणि राजेश फळदेसाई या आमदारांनी तेलंगणाचा दौरा केला आहे.

मुख्यमंत्री मंगळवारी (ता.12) ग्वाल्हेर परिसरात होते. ते जनसंपर्क यात्रेत सहभागी झाले. वाटेतील विविध सभांनाही त्यांनी संबोधित केले. ग्वाल्हेर येथील भाजप कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी गोव्यातील 45 हजारजण दारिद्र्यरेषेच्या वर आल्याचा उल्लेख केला.

त्यांनी या साऱ्याचे श्रेय भाजपच्या डबल इंजिन सरकारला दिले. ‘इंडिया’ ही विरोधी आघाडी आपोआप संपून जाईल; पण सनातन हिंदू धर्म संपणार नाही, असे ते म्हणाले. त्यांच्या या म्हणण्यात आरोग्यमंत्री राणे यांनी सूर मिसळला.

सनातन हिंदू धर्माला नष्ट करण्यास निघालेली ‘इंडिया’ आघाडी संपेल आणि नरेंद्र मोदीच पुन्हा 2024 मध्ये पंतप्रधान होतील, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले. यावेळी आमदार डॉ. दिव्या राणे त्यांच्यासोबत होत्या.

भाजपच्या काही महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना याआधी जोधपूर येथे आठवडाभराचे प्रशिक्षण दिले गेले आहे. ते निवडणूकपूर्व काळात विस्तारक म्हणून काम करणार आहेत. याशिवाय तेलंगणामध्ये विस्तारक म्‍हणून वर उल्लेख केलेले पाच आमदार काम करणार आहेत.

तानावडेंकडे ‘तेलंगणा’

१) भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद शेट तानावडे यांच्याकडे तेलंगणामधील 21 विधानसभा मतदारसंघ आणि तीन लोकसभा मतदारसंघांची निवडणूक जबाबदारी देण्यात आली आहे.

२) मालकागिरी, सिकंदराबाद आणि हैदराबाद या लोकसभा मतदारसंघांतील भाजप पक्ष संघटना बळकट करण्यासाठी तानावडे आता आठवड्यातून दोन-तीन दिवस तेलंगणाचा दौरा करणार आहेत.

३) संयुक्त रंगारेड्डी जिल्ह्याचा काही भाग, संयुक्त हैदराबाद हा पूर्ण जिल्हा तानावडे यांच्याकडे राजकीय कामासाठी भाजपने सोपवला आहे. गेल्या 15 दिवसांत दोनवेळा त्यांनी हैदराबाद येथे अनेक बैठका घेऊन संघटनात्मक कामाला सुरवात केली आहे.

विश्वजीत राणेंकडे ‘मध्यप्रदेश’

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याकडे कर्नाटक विधानसभा निवडणुकीपाठोपाठ आता मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीतील जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी तसा आदेश जारी केला आहे.

त्यानुसार इंदूर जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांतील पक्ष संघटना बळकट करणे आणि त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार जिंकून आणण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे.

भाजप हा राष्ट्रीय पक्ष असल्याने निवडणूक असलेल्या राज्यात नेते, आमदार, कार्यकर्त्यांनी संघटनात्मक कामासाठी जाणे ही सामान्य बाब आहे. गोव्यातील निवडणुकीवेळी तेथील नेते कार्यकर्ते आमच्या मदतीसाठी येत असतात.

- सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: युवा शक्ती आणि उत्साहाचा संचार; 'या' राशींना मिळणार नोकरीत बढती, वाचा राशी भविष्य!

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

SCROLL FOR NEXT