CM प्रमोद सावंत यांच्या समोरच भिडले भाजपचे दोन गट, मध्य प्रदेश जनआशीर्वाद यात्रेत राडा

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत जनआशीर्वाद यात्रेत सहभागी होऊन पक्षाचा प्रचार करताना दिसत आहेत.
Madhya Pradesh BJP Jan Ashirwad Yatra
Madhya Pradesh BJP Jan Ashirwad Yatra
Published on
Updated on

Madhya Pradesh BJP Jan Ashirwad Yatra: मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भारतीय जनता पक्षाची जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत जनआशीर्वाद यात्रेत सहभागी होऊन पक्षाचा प्रचार करताना दिसत आहेत.

सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री बरवानी जिल्ह्यातील सेंधवा येथे दाखल झाले. यावेळी भाजपच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला.

मुख्यमंत्री सावंत सेंधवामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे मडगावमध्ये जंगी स्वागत करण्यात आले आणि तेथून सुमारे 3 किलोमीटर अंतरावरील मंडी प्रांगण येथील जाहीर सभेपर्यंत त्यांचा रोड शो सुरू झाला.

या रोड शोमध्ये माजी मंत्री अंतरसिंह आर्य व त्यांचे पुत्र विकास आर्य तसेच सेंधवा येथील शासकीय पदव्युत्तर महाविद्यालयाच्या लोकसहभाग समितीचे अध्यक्ष व भारतीय जनता पक्ष अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. रैलास सेनानी आणि मोठ्या प्रमाणावर भाजप समर्थक उपस्थित होते.

Madhya Pradesh BJP Jan Ashirwad Yatra
Mopa Airport: मोपा विमानतळावरून टेक ऑफ, लँडिंग महागणार; पुढील महिन्यापासून अंमलबजावणी

जुना आग्रा मुंबई राष्ट्रीय महामार्गावरून जनआशीर्वाद यात्रा गुरुद्वाराकडे वळत असताना विकास आर्य यांच्या समर्थकांनी त्यांच्या बाजूने घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान, डॉ. रैलास सेनानी यांच्या समर्थकांनी याचा निषेध करत, सेनानी यांच्या बाजूने घोषणाबाजी केली.

घोषणाबाजीवरून दोन्ही गटात राडा झाला आणि समर्थकांमध्ये झटापट झाली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आयडीए इंदूरचे अध्यक्ष जयपालसिंह चावडा आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष ओम सोनी यांना खाली उतरून प्रकरण शांत करावे लागले.

यावेळी विकास आर्य यांच्या समर्थकांचा जयपालसिंह चावडा यांच्याशी वादही झाला. रथावर स्वार झालेले कॅबिनेट मंत्री प्रेमसिंग पटेल आणि प्रादेशिक खासदार गजेंद्र पटेल यांनीही दोन्ही गटांची समजूत काढली.

पत्रकारांनी भाजप उमेदवारांच्या दोन गटातील वादाबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना प्रश्न विचारला. भारतीय जनता पक्ष असे वाद हाताळण्यास सक्षम आहे. सेंधवा विधानसभा भाजप 50 हजार मतांनी जिंकेल आणि मध्य प्रदेशात पक्ष दोन तृतीयांश बहुमताने जिंकेल. असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com