Mapusa Theft Case Dainik Gomantak
गोवा

Mapusa Theft Case: चोऱ्यांचे सत्र सुरूच! बार्देशमधील दुचाकी चोरी प्रकरणी मेघालयातील एकाला अटक

तक्रारीची माहिती मिळताच 17 तारखेला बंगळुरूला रवाना झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Theft Case: बार्देश येथील दुचाकी चोरीचा छडा केवळ चोवीस तासांच्या आत लावत पोलिसांनी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

या बाबत मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार बार्देश येथील सूरज पुरुषोत्तम कारापूरकर यांची एप्रिलिया हि दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी सालींगाव पोलीस स्थानकात दिली होती. त्यांनी यासंबंधी अनिकेत मुल अजॉय रॉय, (वय: 22 वर्षे, मूळ रहिवासी मेघालय, सध्या वास्तव्य सांगोल्डा, बार्देश) याच्यावर संशय व्यक्त केला होता.

तक्रारीची माहिती मिळताच पीएसआय मिलिंद यांच्या देखरेखीखाली पीएसआय फ्रान्सिस्को झेवियर आणि पीसी सर्वेश गवस यांच्यासहित पोलिसांची टीम 17 तारखेला बंगळुरूला रवाना झाली. त्यांनी उपलब्ध माहितीच्या आधारे संशयित आरोपीला पकडले असता त्याच्याकडे चोरीची दुचाकी आढळून आली.

तसेच त्याची झडती घेतल्यावर आरोपीने चोरी केलेल्या अन्य दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्या. सदर घटनेचा अधिक तपास सालींगाव पीएस मिलिंद भुईंबर, पर्वरी एसडीपीओ विश्वेश कर्पे आणि एसपी निधिन वलसन यांच्या देखरेखीखाली पीएसआय फ्रान्सिस्को झेवियर करत आहेत.

तसेच फोंडा येथी एका दुचाकी चोरीचा देखील शोध पोलिसांनी मोठ्या सतर्कतेने लावलाय. सध्या गोव्यात राहत असलेल्या पणू मूळच्या पंढरपूर येथील असलेल्या एकाची दुचाकी चोरल्याप्रकरणी चोरट्यास पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी तातडीने पावले उचलत 24 तासांच्या आत चोरट्याला अटक केली आहे. सुशांत गावडे असे या प्रकरणातील संशयिताचे नाव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT