IIT Project Goa: ''नापीक जमीन उपलब्ध असताना हिरव्यागार बागायतीवर नांगरणी का''? फ्रांसीस सार्दिन

आम्ही भाजप सरकारने सुरू केलेले सर्व गोवा विरोधी, पर्यावरण विरोधी प्रकल्प रद्द करू, असे ते म्हणाले.
IIT Project Goa
IIT Project GoaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

IIT Project Goa सांगे- गोव्यातील भाजप सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विनाशकारी अजेंडा गोमंतकीयांवर लादण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारकडे नापीक जमीन उपलब्ध असताना आयआयटीसाठी खाजगी हरित जमीन घेण्याचा भाजप सरकारला अधिकार नाही, असे दक्षिण गोव्याचे खासदार फ्रांसीस सार्दिन म्हणाले.

सांगे येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. ज्येष्ठ उपाध्यक्ष एम के शेख, काँग्रेसचे पदाधिकारी गौतम भंडारी, श्रीमती. जोसेफिन रॉड्रिग्स, आगुस्तीनो फर्नांडिस, जुईसिनो फर्नांडिस आणि इतर कॉंग्रेस कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत सर्वांचा सांगे मतदारसंघात कॉंग्रेस मजबूत करण्यावर भर होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आता मोजकेच दिवस बाकी आहेत. 2024 मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी सरकार स्थापन करेल. आम्ही भाजप सरकारने सुरू केलेले सर्व गोवा विरोधी, पर्यावरण विरोधी प्रकल्प रद्द करू, असे ते म्हणाले.

सांगेतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू करावा. 2024 मध्ये काँग्रेसने दक्षिण गोवा राखून उत्तर गोवा जिंकणे महत्त्वाचे आहे, असे वरिष्ठ उपाध्यक्ष एम के शेख म्हणाले.

सभेला उपस्थित सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी तळागाळात काम सुरू करून सांगेच्या मतदारांचा विश्वास जिंकण्याचे आश्वासन यावेळी नेत्यांना दिले.

IIT Project Goa
Goa Illegal Gambling Case: कळंगुट येथील सट्टेबाजीवर केंद्रावर छापा, दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Government Online Services on WhatsApp Chatbot
Enemy Property Case Goa
Karapur One Goa Project Protest
Goa Rakshan Yatra 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com