Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

...तर सोमवारी गोवा बंद! आंदोलकांचा सरकारला अल्टीमेटम, मास्टरमाईंड शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान

Rama Kankonkar Assault Case: काणकोणकर यांच्यावरील हल्ल्यामागील मास्टरमाईंडला सोमवारपर्यंत अटक न केल्यास सोमवारी गोवा बंदचा इशारा देण्यात आला आहे.

Pramod Yadav

पणजी: रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून, न्यायाची मागणी करत आहेत. विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांनी शुक्रवारी आझाद मैदानांवर आंदोलन केल्यानंतर पोलिस मुख्यालय, भाजप कार्यालयावरही धडक दिली. आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्या सरकारी निवासस्थानाच्या बाहेर गर्दी करत चर्चेशिवाय माघार न घेण्याचा पवित्रा घेतला. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना बाहेरच रोखले.

सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षातील राजकीय नेते, सामाजिक कार्यककर्ते आझाद मैदानावर एकवटले होते. यावेळी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोप राजकीय नेत्यांनी केला. या हल्ल्यामागे मास्टरमाईंड कोण आहे? असा सवाल देखील यावेळी उपस्थित करण्यात आला. हल्ल्यामागील मास्टरमाईंडला सोमवारपर्यंत अटक न केल्यास सोमवारी गोवा बंदचा इशारा देण्यात आला आहे.

आक्रमक झालेल्या आंदोलकांनी पणजीतील पोलिस मुख्यालयाबाहेर देखील गर्दी करत कारवाईची मागणी केली. यानंतर भाजप मुख्यालयावर आंदोलकांनी धडक दिली. दयानंद बांदोडकर मार्गावरुन जाणाऱ्या आंदोलकांमुळे मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. आंदोलक मुख्यमंत्री तथा गृहमंत्री प्रमोद सावंत यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर दाखल झाल्यानंतर त्यांना बाहेरच रोखण्यात आले.

मुख्यमंत्री सावंत यांच्या निवासस्थानी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला असून, पोलिसांनी आंदोलकांना बाहेरच रोखले. दरम्यान, आंदोलकांनी मुख्यमंत्री सावंत यांना भेटल्याशिवाय माघारी न जाण्याचा पवित्रा घेत, तिथेच ठाण मांडले. दुसरीकडे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याप्रकरणातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच, या घटनेतील दोषींना तडीपारही केले जाईल, असे सांगितले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात जखमी रामा काणकोणकर यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. रामा यांची तब्येत सध्या स्थीर असल्याचेही त्यांनी नमूद केले. रुग्णालयाबाहेर आणि त्यांच्या निवास्थानी त्यांना पोलिस सुरक्षा देण्यात येईल, असेही सावंत यांनी स्पष्ट केले. तसेच, आंदोलकांना भेटण्यासही तयार असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Road Accident: 'काळापुढे कुणाचे चालत नाही?' अकाली मृत्यूंच्या मालिकेनं हादरला 'गोवा'!

Lucky Zodiac Signs: निर्जला एकादशीला जुळून येतोय 'द्विद्वादश' आणि 'नवपंचम' योग, 'या' 4 राशींच्या नशिबात होणार सुवर्णबदल; गुंतवणुकीतून होणार पैशांचा पाऊस

Nuvem Apartment Project: 400 मीटर जागेत 8 फ्लॅट्स कसे? नुवेतील नागरिकांचा प्रशासनाला संतप्त सवाल, कचरा, पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर; लवकरच कारवाई?

Konkani Language: गोव्यातूनच कोकणी हद्दपार होण्याच्या मार्गावर? CM सावंतांनी व्यक्त केली खंत: म्हणाले, "60 टक्के घरांतून कोकणी गायब...!"

8th Pay Commission पूर्वी मोदी सरकारचा महाधमाका! 'या' कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू; कोण आहेत मानकरी?

SCROLL FOR NEXT