Rama Kankonkar Assault: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर सहाजणांकडून जीवघेणा हल्ला; हल्लेखोर फरार

Goa Crime News: करंझाळे येथे सहा जणांनी चाकू, वायरच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.
Rama Kankonkar
Rama KankonkarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर सहाजणांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. करंझाळे येथे काणकोणकर यांना गाठून त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हल्लेखोरांनी चाकू, वायरने त्यांना मारहाण केल्याचे प्रत्यक्षर्शी सांगताहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्या करंझाळे येथे सहा जणांनी जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांनी चाकू, वायरने काणकोणकरांना मारहाण केली. हल्ला केल्यानंतर त्यांनी दुचाकीच्या मदतीने घटनास्थळावरुन पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिकचा तपास सुरु आहे.

Rama Kankonkar
Goa Drug Case: मांडवी एक्स्प्रेसमधून उतरला अन् पोलिसांच्या हाती लागला, 3.5 लाखांच्या अमलीपदार्थांसह नेपाळच्या नागरिकाला अटक

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी रामा काणकोण यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. हल्लेखारांना पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी. चुकीच्या गोष्टींबाबत आवाज उठवणाऱ्यांवरोधात गोव्यात गुंडागिरीचा ट्रेंड सुरु आहे, असे आलेमाव म्हणाले.

Rama Kankonkar
Goa Drug Case: मांडवी एक्स्प्रेसमधून उतरला अन् पोलिसांच्या हाती लागला, 3.5 लाखांच्या अमलीपदार्थांसह नेपाळच्या नागरिकाला अटक

सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर भाजप सरकारविरोधात धाडसाने आवाज उठवत आहेत. त्यांच्यावर आज जीवघेणा हल्ला करण्यात आला. हा हल्ला केवळ काणकोण यांच्यावर नसून सत्ताधाऱ्यांनी प्रश्न विचारण्याचे धाडस करणाऱ्या प्रत्येक गोमंतकीयावरचा हल्ला आहे. आम्ही शांत बसणार नाही. आम्हाला न्याय हवा, अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com