Rama kankonkar Assault Case
Protest In PanjimGoa Congress X Handle

CM प्रमोद सावंत यांच्या निवास्थानाबाहेर तगडा पोलिस बंदोबस्त; काणकोणकर मारहाण प्रकरण तापले, राजकीय नेते हजारो नागरिक रस्त्यावर

Rama kankonkar Assault Case: आंदोलकांनी आझाद मैदानावर आंदोलन करुन या हल्ल्यामागील सूत्रधाराला अटक करण्याची मागणी केली.
Published on

पणजी: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षातील नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि हजारो नागरिकांनी शुक्रवारी (१९ सप्टेंबर) आझाद मैदानावर आंदोलन केले.

हल्ल्यामागील सूत्रधाराला अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलकांनी पोलिस मुख्यालय आणि भाजप कार्यालयावर धडक दिल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निवासस्थानाकडे जाताना त्यांना रोखण्यात आले.

रामा काणकोणकरांवर गुरुवारी दुपारी जीवघेणा हल्ला करण्यात आला, या हल्ल्यातील पाच जणांना पणजी पोलिसांनी उशीरा रात्री अटक केली. रामा यांच्यावरील हल्ल्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले असून, राजकीय नेत्यांसह हजारो नागरिक शुक्रवारी रस्त्यावर उतरले. आंदोलकांनी आझाद मैदानावर आंदोलन करुन या हल्ल्यामागील सूत्रधाराला अटक करण्याची मागणी केली.

आझाद मैदानावर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, विजय सरदेसाई, अमित पाटकर, वीरेश बोरकर, अमित पालेकर, व्हेंझी व्हिएगस यासह सामाजिक कार्यकर्ते आणि हजारो नागरिक उपस्थित होते.

Rama kankonkar Assault Case
'गोव्यात गुंडाराज चालू देणार नाही'; रामा काणकोणकरांच्या न्यायासाठी विजय सरदेसाईंचे आझाद मैदानात आंदोलन

आंदोलनासाठी सामाजिक कार्यकर्ते, संस्था आणि वेगवेगळ्या संस्थेच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त करत या हल्ल्याचा निषेध केला.

रामा यांच्यावरील हल्ला प्रत्येक गोमंतकीय व्यक्तीवरचा हल्ला असल्याचे मत काँग्रेस नेते सुनील कंवठणकरांनी व्यक्त केले. तर, आपचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

रामराज्यात राम सुरक्षित नसल्याचे वक्तव्य गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाईंनी केले. रामराज्य नव्हे गुंडा राज्य आहे, राज्यात गुंडागिरीविरोधात टास्क फोर्सची गरज सरदेसाईंनी व्यक्त केली. या हल्ल्यामागे मास्टरमाईंड असून, त्याला अटक करण्याची गरज सरदेसाईंनी व्यक्त केली.

आंदोलनासाठी सामाजिक कार्यकर्ते, संस्था आणि वेगवेगळ्या संस्थेच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त करत या हल्ल्याचा निषेध केला.

Rama kankonkar Assault Case
Vasco: वास्कोतील कचरा पाठवणार काकोड्यात! मुरगाव पालिकेचा निर्णय; सरकारला करणार विशेष अनुदानाची विनंती

रामा यांच्यावरील हल्ला प्रत्येक गोमंतकीय व्यक्तीवरचा हल्ला असल्याचे मत काँग्रेस नेते सुनील कंवठणकरांनी व्यक्त केले. तर, आपचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

रामराज्यात राम सुरक्षित नसल्याचे वक्तव्य गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाईंनी केले. रामराज्य नव्हे गुंडा राज्य आहे, राज्यात गुंडागिरीविरोधात टास्क फोर्सची गरज सरदेसाईंनी व्यक्त केली. या हल्ल्यामागे मास्टरमाईंड असून, त्याला अटक करण्याची गरज सरदेसाईंनी व्यक्त केली.

रामा यांच्यावरील हल्ला लोकशाहीला धोका असल्याचे मत आदीवासी उटा संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडले. मास्टरमाईंटला अटक न झाल्यास गोवा बंदची हाक देण्यात आली आहे.

आंदोलकांनी पोलिस महासंचालकांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवत न्यायाची मागणी केली. आंदोलकांनी पोलिस मुख्यालयाजवळ गर्दी केल्याने यावेळी मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. विरोधी राजकीय नेते आणि आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानाकडे मोर्चा वळवला. दरम्यान, यावेळी आंदोलकांना पोलिसांनी अडवले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निवास्थानाकडे जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखले. मात्र, आंदोलक मुख्यमंत्र्यांना भेटण्याच्या मागणीवर ठाम असून, रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांच्या घराबाहेर तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com