Lucky Zodiac Signs: निर्जला एकादशीला जुळून येतोय 'द्विद्वादश' आणि 'नवपंचम' योग, 'या' 4 राशींच्या नशिबात होणार सुवर्णबदल; गुंतवणुकीतून होणार पैशांचा पाऊस

Nirjala Ekadashi 2026: उद्या (25 जून) देशभरात जगत पालनकर्ता भगवान विष्णूंना समर्पित असलेली अत्यंत पवित्र 'निर्जला एकादशी' साजरी केली जाणार आहे.
Dwidwadash Yog & Navpancham Yog Benefits
Lucky Zodiac SignsDainik Gomantak
Published on
Updated on

Dwidwadash Yog & Navpancham Yog Benefits: उद्या (25 जून) देशभरात जगत पालनकर्ता भगवान विष्णूंना समर्पित असलेली अत्यंत पवित्र 'निर्जला एकादशी' साजरी केली जाणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने यंदाची एकादशी अतिशय दुर्मिळ आणि खास मानली जात आहे, कारण या दिवशी अतिशय फलदायी आणि शुभ मानले जाणारे 'द्विद्वादश' आणि 'नवपंचम' हे दोन मोठे योग जुळून येत आहेत.

पंचांगानुसार, या दिवशी शुक्र आणि शनी ग्रह एकमेकांपासून 120 अंशांवर असतील, ज्यामुळे संध्याकाळी 5 वाजून 29 मिनिटांनी 'नवपंचम योग' निर्माण होईल. तत्पूर्वी, सूर्य आणि अरुण ग्रह 30 अंशांवर आल्यामुळे पहाटे 3 वाजून 16 मिनिटांपासूनच 'द्विद्वादश योग' प्रभावी होईल. या दोन्ही महायोगांचा अत्यंत शुभ प्रभाव काही ठराविक राशींच्या जीवनावर पडणार असून त्यांचे भाग्य चमकणार आहे.

Dwidwadash Yog & Navpancham Yog Benefits
Horoscope 24 June 2026: कुबेराचा खजिना आणि बाप्पाची कृपा! बुधवार ठरणार टर्निंग पॉईंट; 'या' 5 राशींचे भाग्य सोन्यासारखे चमकणार

या भाग्यवान राशींमध्ये पहिली रास म्हणजे कर्क रास होय. कर्क राशीच्या व्यक्तींच्या कौटुंबिक संबंधांमध्ये कमालीची गोडी निर्माण होईल आणि घरातील सदस्यांमधील प्रेम वाढेल. पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी हा काळ उत्तम असून भविष्यात याचा मोठा आर्थिक फायदा होईल, तसेच स्वतःचे वाहन खरेदी करण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते. दुसरी रास म्हणजे कन्या रास असून, या राशीच्या लोकांनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास जुने मतभेद आणि वाद संपुष्टात येतील. घरातील वातावरण शांत राहील, आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होईल आणि एखाद्या चांगल्या ठिकाणी मालमत्ता किंवा संपत्ती खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होईल.

Dwidwadash Yog & Navpancham Yog Benefits
Horoscope: मंगळवार 'या' 4 राशींसाठी ठरणार सुपरहिट; धनलाभ, पदोन्नती आणि यशाचे नवे दरवाजे उघडणार

तिसरी रास असणाऱ्या धनु राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा ठरेल. कार्यक्षेत्रात किंवा ऑफिसमध्ये तुमचा प्रभाव वाढेल आणि अचानक पगारवाढीची गोड बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी काही नवीन आणि मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर येतील, ज्या तुम्ही लीलया पेलू शकाल. तसेच तुमचे लव्ह रिलेशनशिप म्हणजेच प्रेमसंबंध अत्यंत घट्ट आणि आनंददायी राहतील.

Dwidwadash Yog & Navpancham Yog Benefits
Horoscope: मंगलमय मंगळवार! 'या' भाग्यवान राशींचे नशीब फळफळणार, घरात येणार सुख-समृद्धी, आर्थिक प्रगती निश्चित

चौथी रास म्हणजेच मकर रास असून, कठीण प्रसंगात जोडीदाराची खंबीर साथ लाभल्यामुळे तुमचा पुढील प्रवास सुकर होईल. विशेषतः, आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी तुम्ही काही धाडसी आणि योग्य निर्णय घेऊ शकाल, तसेच आरोग्य (Health) उत्तम राहिल्याने मानसिक शांतता लाभेल. भगवान विष्णूंच्या कृपेने या चारही राशींचे रखडलेले प्रश्न मार्गी लागणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com