'गोव्यात गुंडाराज चालू देणार नाही'; रामा काणकोणकरांच्या न्यायासाठी विजय सरदेसाईंचे आझाद मैदानात आंदोलन

Protest At Azad Maidan Panjim: विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आप नेते अमित पालेकर, विजय सरदेसाई आणि मायकल लोबो यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
Vijai Sardesai on law and order Goa
Vijai Sardesai Calls Protest At Azad MaidanDainik gomantak
Published on
Updated on

पणजी: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. गुरुवारी यावरुन राज्यात तीव्र राजकीय पडसाद उमटले. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असल्याचा आरोप राजकीय नेत्यांनी केला. गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाईंनी काणकोणकर यांच्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ आज (१९ सप्टेंबर) आझाद मौदानात आंदोलन करणार आहेत.

रामा काणकोणकर यांच्यावर गुरुवारी जीवघेणा हल्ला करुन अमानुष मारहाण करण्यात आली. करंझाळे येथे झालेल्या या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला. यानंतर राजकीय स्तरातून याप्रकरणी निषेध व्यक्त करण्यात. भाजप नेतृत्वाखालील सरकारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असल्याचा आरोप राजकीय नेत्यांनी केला. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आप नेते अमित पालेकर, विजय सरदेसाई आणि मायकल लोबो यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

Vijai Sardesai on law and order Goa
Omkar Elephant: गोवा-महाराष्‍ट्राकडून ओंकार हत्तीचा ‘फुटबॉल’! वन कर्मचाऱ्यांचा सीमेवर पहारा; सुरक्षितस्‍थळी सोडण्याची गरज

विजय सरदेसाई यांनी रामा काणकोणकरांवरील हल्ल्याचा निषेध करताना याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली. सरदेसाई यांनी काणकोणकरांच्या न्यायासाठी आझाद मैदानात मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन गोमंतकीयांना केले आहे. आता खूप झालं, गोव्यात गुंडाराज चालू देणार नाही. रामा आणि गोव्याच्या न्यायासाठी सर्वांनी एकत्र या, असे आवाहन सरदेसाईंनी केले आहे. गोमंतकीयांचा आवाज दाबला जाऊ शकत नाही, असेही सरदेसाईंनी गोमंकीयांना साद घालताना म्हटले.

Vijai Sardesai on law and order Goa
Rama Kankonkar: भरदिवसा जीवघेणा हल्‍ला, कर्नाटकात पळणाऱ्या संशयितांना उचलले; 'रामा काणकोणकर' प्रकरणाचा घटनाक्रम..

“सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्यांवर केलेला हल्ला निषेधार्ह आहे. हल्लेखोरांनी हल्ला करताना तोंड देखील लपवले नाही, त्यामुळे त्यांना पोलिसांची अजिबात भीती नाही, असे दिसते. राज्यात गुंडागिरी खुलेआम सुरु आहे. १९९० मध्ये बिहारमध्ये ज्या गोष्टी सुरु होत्या त्या आता २०२५ मध्ये गोव्यात सुरु झाल्याचा आरोप”, विजय सरदेसाई म्हणाले.

गोवा काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी देखील रामा काणकोणकरांवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. हा हल्ला लोकशाहीला मोठा धक्का आहे. आमचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. काणकोणकरांसाठी न्यायाची मागणी करतो, असे ठाकरे म्हणाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com