Nuvem Apartment Project: 400 मीटर जागेत 8 फ्लॅट्स कसे? नुवेतील नागरिकांचा प्रशासनाला संतप्त सवाल, कचरा, पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर; लवकरच कारवाई?

Nuvem Apartment Project: नुवे पंचायत क्षेत्रातील ४०० चौरस मीटर जागेत आठ सदनिका बांधण्याचा प्रस्ताव आहे. या सदनिकांच्या बांधकामाला परिसरातील नागरिकांचा विरोध आहे.
Nuvem Apartment Project
Nuvem Apartment ProjectDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: नुवे पंचायत क्षेत्रातील ४०० चौरस मीटर जागेत आठ सदनिका बांधण्याचा प्रस्ताव आहे. या सदनिकांच्या बांधकामाला परिसरातील नागरिकांचा विरोध आहे. या परिसरात ११ प्लॉट असून, त्यापैकी दहा प्लॉटवर प्रत्येकी एक घर आहे. मात्र, ४०० चौरस मीटर जागेत आठ सदनिकांसाठी कोणत्या नियमानुसार परवानगी देण्यात आली, असा प्रश्न स्थानिक उपस्थित करीत आहेत.

या सदनिकांमुळे पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, पार्किंग आणि वाहतुकीच्या समस्या निर्माण होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. तसेच या सदनिका स्थलांतरितांना दिल्या जातील, असा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकल्पाला पुढील परवानग्या देण्यापूर्वी स्थानिकांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Nuvem Apartment Project
Goa Land Conversion: जमीन रूपांतरणाचे तपशील ऑनलाईन जाहीर करा! गोवा माहिती आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

स्थानिकांच्या विरोधामुळे नुवे पंचायतीच्या सरपंच फ्रेडा डिसा यांनी सोमवारी जागेची पाहणी केली. पाहणीदरम्यान स्थानिकांनी फिडोल परेरा यांना तेथे बोलावले. फिडोल परेरा यांनी पाहणीवेळी सरपंचांसमोर काही प्रश्न उपस्थित केल्याने तणाव निर्माण झाला.

सरपंच फ्रेडा डिसा यांनी सांगितले की, या जागेत ११ प्लॉट करण्यास १९९९-२००० मध्ये मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर प्रत्येक प्लॉटवर घरे बांधण्यात आली. स्थानिकांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले आहे. मात्र, नगर नियोजन खात्याकडून परवानगी मिळाल्यास पंचायत काहीही करू शकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Nuvem Apartment Project
Land Fraud Case: अंबेशी येथील जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक, जमीनमालकाची वाळपई पोलिसांत तक्रार दाखल

सरपंच म्हणाल्या की, पाहणी सुरू असताना फिडोल परेरा यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्याच वेळी एक तोतया पत्रकार व्हिडिओ चित्रीकरण करत असल्याचे दिसून आल्याने त्याला तेथून जाण्यास सांगण्यात आले. पाहणीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल.

सरपंचांनी ढकलल्याचा दावा

फिडोल परेरा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, या जागेसाठी केवळ ६० टक्के एफएआर उपलब्ध आहे. त्यापेक्षा अधिक एफएआर देता येत नाही आणि तो वाढविण्याचा अधिकार सरपंचांनाही नाही. सरपंचांतर्फे करण्यात आलेली पाहणी अपूर्ण असल्याचा दावा त्यांनी केला.

Nuvem Apartment Project
Sattari Forest Rights: सत्तरीतील वनहक्क दाव्यांवर जिल्हाधिकाऱ्यांचा हातोडा! 37 पैकी 26 अर्जांना अखेर मंजुरी; कागदपत्रांची कमतरता नडली

तसेच सरपंचांनी आपल्याला ढकलले आणि शिवीगाळ केली, असा आरोपही परेरा यांनी केला. या प्रकरणात माजी आमदार बाबाशान ऊर्फ विलफ्रेड डिसा यांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांनी प्रत्यक्ष येऊन धमकी दिल्याचाही आरोप परेरा यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Smart Meter Controversy
Electricity Bills Goa
Goa CM Pramod Sawant
Goa Human Rights Commission Smart Meter
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com