damu naik warns babu ajgaonkar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: ‘ब्‍लॅकमेलिंग’ खपवून घेणार नाही! आजगावकरांच्या भूमिकेवर भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं; उमेदवारीच्‍या अपेक्षेनं पक्षात न येण्‍याचं केलं आवाहन

goa bjp chief damu naik statement: ‘‘ज्‍यांना मनापासून आपण भाजपचे आहोत असे वाटते, त्‍यांनी पक्षात कधीही यावे. परंतु, उमेदवारीच्‍या अपेक्षेने येत असाल, तर त्‍यांनी भाजपात येऊ नये’’, असे प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: ‘‘ज्‍यांना मनापासून आपण भाजपचे आहोत असे वाटते, त्‍यांनी पक्षात कधीही यावे. परंतु, उमेदवारीच्‍या अपेक्षेने येत असाल, तर त्‍यांनी भाजपात येऊ नये’’, असे प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना स्‍पष्‍ट केले. शिवाय ‘‘ शिवाय पक्ष कुणाचेही ‘ब्‍लॅकमेलिंग’ सहन करणार नाही. माजी मुख्‍यमंत्री बाबू आजगावकर यांनी अपक्ष म्‍हणून पेडणेतून लढण्‍याची भूमिका घेतली असेल, तर त्‍यांनी खुशाल पुढे जावे’’, असा सल्लाही त्‍यांनी दिला.

येत्‍या विधानसभा निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर, भाजपला याआधी रामराम केलेले तसेच इतर काही नवे नेते भाजपात (BJP) येण्‍याच्‍या प्रयत्‍नात आहेत. त्‍यातील काही जण उमेदवारीच्‍या अपेक्षेने येत आहेत. त्‍यांना तुम्‍ही काय सल्ला द्याल असा प्रश्‍‍न पत्रकारांनी केलहा असता, ‘‘निवडणुकीसंदर्भातील सर्व निर्णय योग्‍य त्‍या वेळी घेतले जातील. ज्‍यांना मनापासून भाजप आपला वाटतो. त्‍यांनी कधीही पक्षात यावे. त्‍यांच्‍यासाठी पक्षाची दारे सदैव खुली आहेत. परंतु, उमेदवारीच्‍या आशेने कुणी येण्‍याचा विचार करीत असेल, तर त्‍यांनी न आलेले बरे’’, असे दामू नाईक म्‍हणाले.

माजी उपमुख्‍यमंत्री बाबू आजगावकर अजूनही भाजपातच आहेत. तरीही पेडणे मतदारसंघात त्‍यांनी काम सुरू केले आहे. भाजपने उमेदवारी न दिल्‍यास पेडण्‍यातून अपक्ष म्‍हणून निवडणूक लढवण्‍याची तयारीही त्‍यांनी सुरू केलेली आहे. याबाबत विचारले असता, ‘‘बाबू आजगावकर यांनी अपक्ष लढण्‍याची भूमिका घेतली असेल, तर खुशाल पुढे जावे. भाजप रिती, नीतीनुसार चालतो. पक्ष कुण्‍या एकट्याची मक्तेदारी नाही. शेकडो जणांनी काम करून पक्ष वाढवलेला आहे’’, असेही त्‍यांनी नमूद केले.

मगोपने युतीचा धर्म पाळावा!

पेडणेत काहीच दिवसांपूर्वी मगोने सभा घेतली. त्‍यावरून नाराज झालेल्‍या आमदार आर्लेकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी घेतलेल्‍या भेटीसंदर्भात बोलताना, ‘‘भाजप–मगो युतीत आहेत. त्‍यामुळे मगो पक्षाने भाजप आमदार नसलेल्‍या मतदारसंघांत काम करावे. जिथे भाजपचा आमदार आहे, तिथे वेगळ्या पद्धतीने काम करणे चुकीचे आहे. मगोने युती धर्म पाळला पाहिजे’’, असेही दामू म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT