Goa Nightclub Fire Dainik Gomantak
गोवा

हडफडे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख, तर जखमींना 50 हजारांची आर्थिक मदत; CM प्रमोद सावंतांची घोषणा

Goa Nightclub Fire Update: हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन' क्लबमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आलेली आहे.

Sameer Amunekar

पणजी: हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन' क्लबमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आलेली आहे. क्लबचे मालक सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून, त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल. या क्लबला बेकायदेशीरीत्या परवाने एकाही अधिकाऱ्याला सोडले जाणार नाही. त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

रविवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदावेलू आणि पोलीस महासंचालक अलोक कुमार उपस्थित होते.

या घटनेस जबाबदार ठरवून आतापर्यंत क्लबचे सरव्यवस्थापक राजीव मोदक, व्यवस्थापक विवेक सिंग, बार व्यवस्थापक राजीव सिंघानिया आणि गेट व्यवस्थापक हिमांशू ठाकूर या चार जणांना अटक करण्यात आलेली आहे.

मृत पावलेल्‍यांच्‍या कुटुंबियांना प्रत्‍येकी पाच लाख

मूळ दिल्ली येथील असलेले क्लबचे मालक सौरभ लुथरा आणि गौरव लुधरा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलेला असन त्यांनीही लवकरच अटक करण्‍यात येईल, असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले. हडफडे येथील घटनेत मृत पावलेल्‍यांच्‍या कुटुंबियांना प्रत्‍येकी पाच लाख आणि जखमींना प्रत्‍येकी ५० हजार रुपये राज्‍य सरकारमार्फत देण्‍यात येतील, अशी घोषणा मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावत यांनी केली.

हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ या क्‍लबमध्‍ये शनिवारी मध्‍यरात्री इलेक्‍ट्रीक फटाक्‍यांमुळे आग लागली. तेथे कोणत्‍याही प्रकारचा स्‍फोट झाला नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्‍या जवानांनी तत्‍काळ तेथे धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्‍याचा प्रयत्‍न केला.

परंतु, या घटनेत एकूण २५ जणांचा मृत्‍यू झाला. घटनेत जे २५ जण दगावले, त्‍यातील २३ जणांचा गुदमरून मृत्‍यू झाल्‍याचे तपासातन समोर आलेले आहे. जखमी झालेल्‍या सहा जणांवर सध्‍या बांबोळी येथील गोमेकॉत उपचार सुरू आहेत, असे मुख्‍यमंत्री डॉ. सावत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT