Property Fraud: 5 लाखांत फ्लॅटचे स्वप्न दाखवले, 250 जणांना 4 कोटींचा गंडा; आरोपी उत्तर प्रदेशात अटकेत

Goa Flat Investment Fraud: अवघ्या पाच लाख रुपयांत फ्लॅट मिळवून देण्याचे आमिष दाखवून २५० जणांकडून सुमारे चार कोटी रुपये उकळून फरार झालेल्या नूर अहमद याला वास्को पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली.
Goa Flat Investment Fraud
Property FraudDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

वास्को: अवघ्या पाच लाख रुपयांत फ्लॅट मिळवून देण्याचे आमिष दाखवून २५० जणांकडून सुमारे चार कोटी रुपये उकळून फरार झालेल्या नूर अहमद याला वास्को पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.

या प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर पत्नी व मुलासह नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना सप्टेंबर २०२२ मध्ये त्याला भारत-नेपाळ सीमेवर अटक झाली होती. जामिनावर सुटका झाल्यानंतर तो पुन्हा फरार झाला होता. अखेर २३ नोव्हेंबर रोजी तो पोलिसांच्या हाती लागला. एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या अहमदने पुढे प्रॉपर्टी ब्रोकर म्हणून काम सुरू केले. २०१८ मध्ये पाच लाख रुपये गुंतवल्यास काही वर्षांत स्वतःच्या मालकीचा फ्लॅट मिळेल, अशी योजना त्याने मांडली.

Goa Flat Investment Fraud
Goa Politics: 'मनोज परब प्रसिद्धीसाठी धडपडत आहेत'; विजय सरदेसाईंचा आरजीपी नेत्याला टोला

फ्लॅट मिळेपर्यंत भाड्याच्या घरात राहण्याची किंवा दरमहा भाड्याची रक्कम मिळण्याची हमी दिल्याने अनेकांनी राहते घर, दागिने विकून किंवा कर्ज काढून पैसे गुंतवले. मात्र, गुंतवणूकदारांना दाखवलेले फ्लॅट प्रत्यक्षात भाडेपट्टीवर घेतलेले होते. गुंतवणूकदारांची संख्या वाढल्यानंतर अहमदने फ्लॅटचे भाडे आणि इतरांना देण्यात येणारी मासिक रक्कम बंद केली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काही जणांनी वास्को पोलिसांकडे तक्रार केली. आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केल्यानंतर अहमद गोव्यातून फरार झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.