

वाळपई: भुईपाल-सत्तरी येथील एसीजीएल (बीबीडी) जंक्शनवर बसच्या धडकेत देवानंद सुरेंद्र सावकर (७०) ऊर्फ जॉली टेलर यांचा जागीच मृत्यू झाला. ते वाळपईचे रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, देवानंद सावकर हे वाळपईला जाणारी बस पकडण्यासाठी एसीजीएल जंक्शनवर थांबले होते.
यावेळी बस बांधणी प्रकल्पातून बाहेर पडलेली बस वाळपईच्या दिशेने जात असताना तिच्या चेसिसची त्यांना जोरदार धडक बसली. त्यामुळे ते खाली पडले आणि बसचे चेसिस अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वाळपई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
‘जॉली टेलर’ नावाने परिचित
देवानंद सावकर हे ‘जॉली टेलर’ या नावाने वाळपई परिसरात परिचित होते. अनेक वर्षे ते टेलरिंग व्यवसायात कार्यरत होते. सध्या वेळूस येथे त्यांचे दुकान होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी वाळपई पोलीस अधिक तपास करीत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.