Tourist Robbery: 'एस्कॉर्ट सर्व्हिस'च्या बहाण्याने पर्यटकाची लूट, रोशनीविरुद्ध न्यायालयाचा मोठा निर्णय

Escort Service Tourist Robbery: रोशनी हिने एस्कॉर्ट सर्व्हिसच्या बहाण्याने पर्यटकाला पणजीतील एका हॉटेलमध्ये येथे बोलावले.
Escort Service Tourist Robbery
Tourist RobberyDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: ‘एस्कॉर्ट सर्व्हिस’ पुरवण्याच्या बहाण्याने आंध्र प्रदेशातील एका पर्यटकाला हॉटेलमध्ये बोलावून डांबून ठेवणे, मारहाण करणे आणि त्याच्याकडील रोकड व मोबाईल लुटल्याच्या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी रोशनी कावस हिच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पुराव्याअभावी न्यायालयाने तिला दोन कलमांखालील आरोपांतून दोषमुक्त केले.

ही घटना १४ डिसेंबर २०२२ रोजी पहाटे घडली होती. रोशनी हिने एस्कॉर्ट सर्व्हिसच्या बहाण्याने पर्यटकाला पणजीतील एका हॉटेलमध्ये येथे बोलावले. त्यानंतर त्याला मळा-पणजी येथील एका हॉटेलमध्ये नेऊन डांबून ठेवले. तेथे शिवीगाळ करून कानशिलात लगावली तसेच २५ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून घेत १५ हजार रुपयांची रोकड उकळली. आणखी २० हजार रुपये न दिल्यास साथीदारांना बोलावून मारहाण करण्याची धमकीही दिली होती.

Escort Service Tourist Robbery
Goa Politics: 'मनोज परब प्रसिद्धीसाठी धडपडत आहेत'; विजय सरदेसाईंचा आरजीपी नेत्याला टोला

पर्यटकाची सुटका

रोशनी आपल्या साथीदाराशी फोनवर बोलण्यात गुंतलेली असताना मध्यरात्रीनंतर सव्वा एकच्या सुमारास संधी साधून पर्यटकाने खोलीतून पळ काढला आणि तिच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.