Goa Crime Case Dainik
गोवा

Goa Crime Case: वर्षाच्या शेवटच्या दिवशीही राज्यात अपघात- चोरीच्या घटनांचा सिलसिला; दोन घटनांत एकाचा मृत्यू

Goa Crime Case: वाहतूक पोलीस अपघातग्रस्त जागी तैनात असून काही बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघात घडल्याचे प्रकार होत आहेत.

Ganeshprasad Gogate

Goa Crime Case: पांझरखाणी कुंक्कळी येथे कार आणि दुचाकीत अपघात होऊन दुचाकी चालक यश घोडेकर याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येतेय.

या अपघातातील कार चालक गिरीश कोमरपंत याच्यावर कुंक्कळी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्याचीही प्राथमिक माहिती मिळतेय.

या घटनेसंबंधी सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र राज्यातील रस्ते अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

तर कुर्टी फोंडा ते मोले दरम्यान कदंबा बस मधून प्रवास करणाऱ्या बेळगाव येथील एका महिलेची पर्स चोरीला गेल्याची घटना घडली असून सुमारे 3.5 लाखांचा ऐवज लंपास झल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेबाबतही अद्याप सविस्तर माहिती समजू शकली नाहीय.

वाहतूक पोलीस अपघातग्रस्त जागी तैनात असून काही बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघात घडल्याचे प्रकार होत आहेत.

रविवारी सकाळी म्हापसा-शिवोली मार्गावरील झेवियर कॉलेज रोडवर इलेक्ट्रिक दुचाकी आणि अँप टॅक्सी मध्ये अपघात झालाय.

हा अपघात CCTV मध्ये कैद झालाय. सदर अपघातामध्ये टॅक्सी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असून त्याची इलेक्ट्रिक दुचाकीला धडक बसली.

ही धडक एवढी जबरदस्त हाती की दुचाकीस्वाराच्या मागे बसलेली व्यक्ती धक्क्याने उडून रस्त्याच्या बाहेर जाऊन पडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT