Aam Aadmi Party's work is in full swing in Mandrem constituency Dainik Gomantak
गोवा

Goa: मांद्रे मतदार संघातील आम आदमी पक्षाचे कार्य गतिमान

शहापूरकर यांनी पुढे बोलताना सांगितले कि जिल्हा पंचायत निवडणुकीत आम आदमी पक्षातर्फे उमेदवार दिला होता .

दैनिक गोमन्तक

मोरजी: मांद्रे मतदार संघातील आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) कार्य गतिमान होत असून विविध उपक्रमाद्वारे सर्वसामान्य नागरिक पक्षाकडे जोडला जात आहे . अशी माहिती , मांद्रेचे आम आदमी पक्षाचे नेते वकील प्रसाद शहापूरकर यांनी पत्रकारांकडे बोलताना सांगितले .

शहापूरकर यांनी पुढे बोलताना सांगितले कि जिल्हा पंचायत निवडणुकीत आम आदमी पक्षातर्फे उमेदवार दिला होता . पक्षाच्या सक्रीय कार्य त्यागोदर एक महिना सुरु झाले होते . प्रचाराला वेळ कमी मिळाला ,पक्ष बांधणी मतदा संघात सुरु झाली नव्हती . तरीसुद्धा पक्षाची धोरण तळागाळात वावरणारा सुशिक्षित व संवेदनशील व चारित्र्यवान अश्या प्रसाद शहापूरकर याना उमेदवारी देवून निवडणुकीत आव्हान उभे केले होते .

जिल्हा पंचायत निवडणुकीत प्रसाद शहापूरकर यांनी आठशे मते घेवून इतर राजकीय पक्षाचे लक्ष आपल्याकडे केंद्रित केले होते . एक खंबी प्रचारातून एवढी मते मिळवल्याबद्दल आम पार्टी व त्यांचे नेते शहापूरकर यांचे अस्तित्व दिसून आले . या निकालानंतर पक्षाने आपले कार्य अधिक जोमाने सुरु केले . कोविड्च्या काळात ओक्सिमिटर ,वाहनसेवा अत्यावश्यक सेवा देण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला

वीज आंदोलन द्वारे गावात बैठका घेतल्या ,रेशन सेवा सुरु केली तुये , हरमल पालये , , मांद्रे गावातील ,काही प्रभागात पूर्ण केले आहे . तर हि सेवा सर्वापर्यंत पोचवण्यासाठी धडपड आहे . नागरिकाना अर्ज लिहून देणे , सरकारी कार्यालयात त्यांच्यासोबत जावून प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत करणे अशी कामे हाती घेतली आहे .

प्रत्येक गावात बूथ समिती ग्राम समिती ,काढण्याचा कामास प्रारंभ झाला आहे .मांद्रे मतदार संघात हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या काही कार्यकर्त्याना घेवून पक्षाचे कार्य सुरु केले . त्या पक्षाकडे एक वर्षाच्या आत सेवाभावी कार्य कर्त्याची फळी निर्माण झाली आहे व अनेकजण आम पार्टीचे सदस्य होण्यासाठी पुढे येत आहेत अशी माहिती पक्षाचे नेते प्रसाद शहापूरकर यांनी दिली .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT