सासष्टी : (Salset) राज्यात (Goa State) गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे (Heavy rain) भातशेतीमध्ये (Paddy) पाणीच पाणी झाल्यामुळे धोका (Dengerous) निर्माण झाला आहे. राज्यातील विविध भागात लागवड केलेल्या भातशेतात पाणी साचल्याने कृषी विभागाला (Agriculture Office) पाहणी करून पंचनामे करण्यास शक्य होत नसून राज्यातील ३०० ते ४०० हेक्टर भातशेती पाण्याखाली (Under Watter) गेल्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. पाऊस कमी झाल्यास नुकसान भरपाई देण्यासाठी त्वरित मूल्यांकन करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी खात्याचे संचालक (Agriculture Director) नेव्हील आफान्सो (Nevil Afonso) यांनी दिली. राज्यात सुमारे ३०० ते ४०० हेक्टर भातशेती पाण्याखाली गेली आहे. पावसाने विश्रांती घेतल्यावर त्वरित पंचनामे करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
Goa: यंदा लावणीच्या हंगामात भरपूर पाऊस पडल्याने भातशेतीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. नुकतीच लागवड केल्यामुळे रोपे लाहान असून रोपे मरण्याची शक्यता कमी आहे. पण, पंधरा दिवसांच्या वर भातशेतीत पाणी साचून राहिल्यास रोपे खराब होण्याची शक्यता आहे. नुकसान भरपाई (Indemnity) संबंधी भातशेतीचे मूल्यांकन (Evaluation) करण्यासाठी सर्व कृषी उपविभागीय अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. पण, जोपर्यंत शेतातील पाणी उतरत नाही, तोपर्यंत मूल्यांकन करणे अशक्य आहे.
पावसामुळे पिकांची नासाडी झाल्यास शेतकऱ्यांना शेतकरी आधार निधीच्या स्वरुपात आर्थिक मदत पुरविण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा रानटी जनांवरामुळे पीकांचे नुकसान झाल्यास ही निधी शेतकऱ्यांना मिळत असून मानवाने निर्मित केलेल्या आपत्तीमुळे भातशेतीचे नुकसान झाल्यास ही निधी मिळत नाही. तरी, कृषी विभाग अन्य कुठल्या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरविण्यासाठी प्रयत्न करीत आहे, असे कृषी संचालक नेव्हील आफान्सो यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.