Goa: माडेमळ फतर्पा भागातील गणपती विसर्जन (Ganpati Immersion) करण्यासाठी नदीकाठी कठडयाची सोय नसल्याकारणाने गावच्या लोकांची बरीच गैरसोय होत होती. ही गैरसोय लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री आणि स्थानिक आमदार चंद्रकांत (बाबू) कवळेकर (Deputy CM Babu Kavlekar) यांनी लागलीच येथील गणपती विसर्जनाच्या ठिकाणी कठडा आणि निवाऱ्याच्या बांधकामाची सुरवात केली.
यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत स्थानिक पंच आणि केपे भजप महिला मोर्चा अध्यक्ष शीतल सुरेन्द्र नाईक, माजी सरपंच मेदिनी नाईक, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विराज देसाई, श्री शांतादुर्गा देवस्थानचे माजी अध्यक्ष खुशाली देसाई, निळबा देसाई, माजी सरपंच गणेश देसाई आणि अविनाश फातर्पेकर, सुरेन्द्र फळदेसाई दीपक उर्फ घोडो फळदेसाई, सुरेन्द्र कामत आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री कवळेकरांनी, माडेमळ आणि आसपासच्या वाड्यावर गावात आधी गणपती पूजन एकटा दुकटाच करत असल्याने इथे निवारा शेड किंवा नदीकिनारी गणपती मूर्ती ठेऊन पूजा करण्यासाठी काठडयाची सोय नव्हती. पण हल्लीच्या काळात गणपती पूजन करणाऱ्या जनतेची संख्या वाढल्याने या कठडयाबरोबरच निवाऱ्याची सोय करत असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्र्यांनी स्वखर्चानेा ही सोय केली असून, त्याचे भूमिपूजन स्थानिक नागेश देसाई यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
फतर्पा भागातच येणाऱ्या काळात ५ कोटी खर्चून सर्व रस्त्यांची डागडुजी करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी शेवटी आपल्या भाषणात सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विराज देसाई यांनी केले तर आभार प्रदर्शन शीतल नाईक यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.