Goa Govt. Jobs: गोवा सरकार नोकऱ्या विकत आहे ?

नोकऱ्यांच्या विक्री प्रकरणी लोकायुक्तांनी स्वेच्छा दखल घ्यावी; काँग्रेस नेते एल्विस गोम्स (Goa Govt. Jobs)
Goa Congress Leader Elvis Gomez in Press Conference with 2 other members (Goa Govt. Jobs)
Goa Congress Leader Elvis Gomez in Press Conference with 2 other members (Goa Govt. Jobs)Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Govt. Jobs: गोवा सरकार नोकऱ्या विकत आहे. उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर (Deputy CM Babu Kavlekar) यांनी केलेल्या जाहिर वक्तव्यातून हे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाची लोकायुक्तांनी स्वेच्छा दखल घ्यावी, यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. असा इशारा कॉंग्रेसचे नेते (Goa Congress Leader) एल्वीस गोम्स यांनी आज दिला. आज पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोम्स बोलत होते. यावेळी एनएसयुआयचे गोवा अध्यक्ष नौशाद चौधरी व पणजीचे नगरसेवक जोयेल आंद्राद उपस्थित होते.

Goa Congress Leader Elvis Gomez in Press Conference with 2 other members (Goa Govt. Jobs)
Goa Assembly Election 2022: राज्यात वाहू लागलेत निवडणुकीचे वारे...

कवळेकर यांनी एका कार्यक्रमात बोलताना काही आमदार व मंत्री नोकऱ्या विकतात, आपण तसे करत नाही. असे म्हटल्याचे सांगून यावरुन राज्यात नोकऱ्या विकल्या जात असल्याचे सिध्द होत असल्याचा आरोप गोम्स यांनी यावेळी केला. भाजपच्या एका सरकारने नोकर भरती आयोग स्थापन केला व दुसऱ्या सरकारने त्याचे अधिकार काढून घेतले. गेली चार वर्षे गप्प बसून आता निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात नोकर भरती करणे (Recruiting in the face of elections) ही संशयास्पद गोष्ट आहे. कारण सर्व प्रक्रिया पूर्ण करणे पाच महिन्यात शक्य नाही. असा दावाही गोम्स यांनी यावेळी केला.

Goa Congress Leader Elvis Gomez in Press Conference with 2 other members (Goa Govt. Jobs)
Goa: मुरगाव 'एमइएस' ला ५० वर्षे पूर्ण...

जेनीमा पिंटोसह इतर दोन महिलांनी न्यायालयात लढा जिंकून नोकऱ्या प्राप्त केल्या होत्या, तशी पाळी गोव्यातील बेरोजगारवर येऊ शकते. असे सांगून मागील काळात ३२ युवांवर झालेला अन्याय अद्याप निस्तरला गेला नाही. असेही गोम्स यांनी यावेळी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com