Girish Chodankar Dainik Gomantak
गोवा

Goa: कॉंग्रेस सोडलेल्या आमदारांना उमेदवारी.. दिल्यास- चोडणकर

दैनिक गोमन्तक

काँग्रेस मधून भाजप मध्ये गेलेल्या आमदारांना एखाद्या पक्षाने आपल्या पक्षातून येणार्‍या गोवा विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिल्यास त्या पक्षाबरोबर काँग्रेस पक्ष (Congress Party) युतीची साधी चर्चासुद्धा करणार नसल्याची चेतावणी गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी दिली. वास्को बायणा येथील मुरगाव काँग्रेस मंडळाच्या कार्यालयात गट समित्या तसेच पक्षाच्या विविध विषयावर चर्चा करण्यासाठी आले असता वरील माहिती गोवा काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली.

यावेळी त्यांच्या समवेत गोवा काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर (Sankalp Amonkar) मुरगाव काँग्रेस गटाध्यक्ष महेश नाईक (Mahesh Naik) माजी नगराध्यक्ष शरद चोपडेकर, नगरसेविका योगिता पार्सेकर, श्रद्धा आमोणकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. पुढे माहिती चोडणकर म्हणाले की काँग्रेस मधून भाजप मध्ये गेलेल्या दहा आमदारांना राज्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एखाद्या स्थानिक किंवा केंद्रातील पक्षांनी उमेदवारी जाहीर केल्यास याचा परिणाम त्या पक्षाला भोगावा लागणार.

बंडखोर दहा आमदारांना जर एखाद्या पक्षाने उमेदवारी दिल्यास त्या पक्षाबरोबर गोवा काँग्रेस पक्ष युती करणार नसल्याचे माहिती अध्यक्ष चोडणकर यांनी पत्रकार परिषदेतून केली. तसेच बंडखोर काँग्रेसमधील आमदारांना इतर पक्षांनी उमेदवारी दिल्यास त्या पक्षाबरोबर युतीची चर्चा सुद्धा करणार नसल्याची चेतावणी चोडणकर यांनी यावेळी दिली.

केंद्रात व राज्यात भाजप पक्षावर जनता नाराज झालेली आहे. या पक्षाने अच्छे दिनचे स्वप्न दाखवून गेल्या सात वर्षात सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडलेले आहे. मुरगावातून काँग्रेस पक्षासाठी संकल्प आमोणकर यांचे नेतृत्व योग्य मार्ग दाखवणार आहे. त्याने पक्षासाठी संपूर्ण गोव्यात सक्रीय कार्यकर्ता प्रमाणे कार्य केले असल्याची माहिती गिरीश चोडणकर यांनी दिली.

कोरोना महामारीत राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे तीन हजार नागरिकांना जीव गमवावा लागलेला आहे. यात दोनशे कोरोना रुग्ण ऑक्सिजनची कमतरता असल्याने मृत्यू झाला होता. त्याला पूर्णपणे जबाबदार येथील भाजप सरकार असल्याची टीका गिरीश चोडणकर यांनी केली. या पक्षातील आमदारांनी कोरोना औषधावर सुद्धा मोठ्या प्रमाणात घोटाळा केला असल्याची माहिती चोडणकर यांनी दिली. केंद्रातून मोदी आणि शाह महामारी कायमची दूर करण्यासाठी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.

केकच्या जागी चप्पलचा हार घालावा'

काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेल्या दहा आमदारांना 'आम आदमी' पक्षाने केकच्या जागेवर चप्पलचा हार घातला पाहिजे होता अशी माहिती पत्रकार परिषदेत गिरीश चोडणकर यांनी दिली. गोव्यात 'आप' भाजपची बी टीम असल्याची माहिती चोडणकर यांनी दिली. गेल्या विधानसभा निवडणुकीत आपने काँग्रेसचे तीन ते चार आमदारांना पाडण्यास भाजप पक्षाला सहकार्य केले होते. 'आप' राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दुसरा पक्ष असल्याची माहिती चोडणकर यांनी दिली. काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांना आम आदमी पक्षाने केक भेट करून फक्त नाटक केलेले आहे. त्यांना केक च्या जागी चपलांचा हार घालायला पाहिजे होता. हा पक्ष फक्त गोव्यात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी भाजपला सहकार्य करीत असल्याची टीका चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत शेवटी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT