औद्योगिक विकासाला नवी चालना! वेर्णा येथे 'एनटीझेडएससीएच'चा प्रकल्प सुरू; 80 टक्के रोजगार गोमंतकीयांना

NETZSCH new facility Verna Goa: भारतातील दोन दशकांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण करताना ‘एनटिझेडएससीएच पंप ॲण्ड सिस्टिम इंडिया’ कंपनीने गोव्यातील वेर्णा औद्योगिक वसाहतीत आपल्या नवीन विस्तारीत उत्पादन प्रकल्पाच्या उद्‌घाटनाची घोषणा केली.
NETZSCH new facility Verna Goa
NETZSCH new facility Verna GoaDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: भारतातील दोन दशकांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण करताना ‘एनटिझेडएससीएच पंप ॲण्ड सिस्टिम इंडिया’ कंपनीने गोव्यातील वेर्णा औद्योगिक वसाहतीत आपल्या नवीन विस्तारीत उत्पादन प्रकल्पाच्या उद्‌घाटनाची घोषणा केली. या प्रकल्पाचे उद्‌घाटन मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उद्योगमंत्री मााविन गुदिन्‍हो, गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार आलेक्‍स रेजिनाल्‍ड लॉरेन्‍स, महामंडळ तसेच विडीएमचे वरिष्ठ अधिकारी, कंपनीचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

कंपनीने वेर्णा औद्योगिक वसाहतीत सुमारे ४५ हजार चौ. मी. क्षेत्रफळावर हा आधुनिक प्रकल्प उभारला आहे. त्यातील १२,५०० चौ. मी. क्षेत्र उत्पादनासाठी राखीव आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्री, उच्च दर्जाचे अभियांत्रिकी तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक उपाययोजनांचा समावेश या प्रकल्पात करण्यात आला आहे.

प्रकल्पात केव्ही क्षमतेचे रूफटॉप सोलर सिस्टम बसवण्यात आले असून तो आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रमाणपत्रासाठी डिझाईन करण्यात आला आहे. त्यामुळे ऊर्जा बचत, कार्बन उत्सर्जनात घट आणि शाश्‍‍वत औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.

NETZSCH new facility Verna Goa
Goa Politics: पणजी, फोंडा निवडणुकीवर भाजपने ठरविली रणनीती! गाभा समितीची बैठक, संघटनात्मक हालचालींना वेग

या गुंतवणुकीमुळे उत्पादन क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार असून स्थानिक स्तरावर आयजीबी गोल्ड स्टँडर्डनुसार रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. कंपनीच्या मते, या प्रकल्पामुळे गोवा राज्य औद्योगिक नकाशावर अधिक बळकट होईल आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला चालना मिळेल.

गोव्‍याच्‍या औद्योगिक प्रगतीबाबत कंपनी समाधानी

उद्‌घाटनानंतर माध्यमांशी संवाद साधताना कंपनीचे वरिष्ठ अधिकारी मोरित्झ नेटस्, पॉल नेटस्, आंद्रेयास डेन्कर, विवेक नॉर्मन व संचालक सचिन मिरजकर यांनी गोव्यातील औद्योगिक प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले. २०१० पासून कंपनी गोव्यात कार्यरत असून वेर्णा प्रकल्पात ८० टक्के रोजगार गोमंतकीयांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

NETZSCH new facility Verna Goa
Goa Opinion: भविष्यात आपल्या राज्यातून आणखीही 'केसरबाई केरकर' निर्माण होऊ शकतात; संगीत संमेलने

भारत ही दीर्घकालीन औद्योगिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ असून जर्मनीतील मुख्यालय आणि भारतातील कार्यसंघ यांच्यातील समन्वयामुळे तंत्रज्ञान देवाणघेवाण, अभियांत्रिकी उत्कृष्टता आणि शाश्वत औद्योगिक वाढीस गती मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

  एकूण क्षेत्रफळ : ४५,००० चौ. मी.

  उत्पादन क्षेत्र : १२,५०० चौ. मी.

  रूफटॉप सोलर सिस्टमची सुविधा

  आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रासाठी डिझाईन

  उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ

  पर्यावरणपूरक, ऊर्जा कार्यक्षम रचना

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com