Goa Politics: ‘काँग्रेसमध्ये कुणाचा पायपोस कुणाला आहे का?’

गोवा (Goa) आप कार्यकर्त्यांशी हुज्जत घालताना कोसेंसाव कॉस्ता, सध्या हा व्हिडिओ राजकीय चर्चेचा विषय बनला आहे.
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: नुवेचे आमदार विल्फ्रेड (बाबाशान) डिसा हे काँग्रेस सोडून भाजपात गेले याचा जाब विचारण्यासाठी आपचे कार्यकर्ते जातात, तेव्हा त्यांना बाबाशानचे समर्थक अडवितात. त्यातील एक समर्थक कोसेंसाव कॉस्ता हा कार्यकर्ता प्रतिमा कुतिन्हो यांना सांगतो, ‘मी काँग्रेसमन, बाबाशानला काही विचारायचे असल्यास मी विचारेन, तुम्हाला येथे येऊन त्यांना जाब विचारायचा अधिकारच काय?’ हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमातून फिरत असून सध्या नेटकरी प्रश्न विचारू लागले आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपला विकले गेले का? त्याचबरोबर आणखीही एक प्रश्न विचारला जात आहे, गोव्यातील काँग्रेसमध्ये कुणाचा पायपोस कुणाला आहे का? (Goa Politics Were Congress workers sold to BJP)

Goa Politics
प्रसिद्धीचा स्टंट: GOA राज्यपालांच्या शपथग्रहणाचा हट्टाहास का?

गोव्यात काँग्रेसच्या नेतृत्वात बदल पाहिजे अशी मागणी मूळ धरू लागलेली असतानाच दुसऱ्या बाजूने काँग्रेस कार्यकर्ते अशी मनमानी करू लागले आहेत, त्यांच्यावर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही हे स्पष्ट होत आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या दक्षिण गोवा जिल्हा समितीचे उपाध्यक्ष दीपक खरंगटे यांनी भाजपच्या ‘सेवा ही संघटन’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती, त्यावेळीही हाच प्रश्न विचारला गेला होता. जोएल डिसोझा या काँग्रेस कार्यकर्त्याने याबाबत केलेला प्रश्न विचार करण्यासारखा आहे. तो म्हणाला, ‘वास्तविक असा निषेधात्मक कार्यक्रम काँग्रेसने आयोजित करणे आवश्यक होते, पण असा कार्यक्रम आप आयोजित करते आणि काँग्रेस पक्षातून फुटून भाजपात गेलेल्या आमदारांचे समर्थन करतात हे सगळेच दुर्दैवी आहे.’

सध्या काँग्रेसमध्ये जे काय चालले आहे त्यावर भाष्य करताना खासदार फ्रान्सिस सार्दिन म्हणाले, ‘सध्या काँग्रेसमध्ये व्यवस्थापनाच्या नावावर केवळ गैरव्यवस्थापन चालू असून त्याला सर्वस्वी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत हे जबाबदार आहेत.

Goa Politics
Goa: काणकोणात साधनसुविधांची वानवा

"सध्या गोव्यात काही लोक असे आहेत जे मनाने काँग्रेस बरोबर नाहीत, पण ते पदे अडवून बसले आहेत. अशी माणसे असल्यास आपण सहज जिंकून येऊ याची भाजपला खात्री असल्याने तेही अशा माणसांना आतून पाठिंबा देतात. ही परिस्थिती बदलायची असेल, तर पक्षश्रेष्ठींनी काही बदल करण्याची गरज आहे."

- फ्रान्सिस सार्दिन, खासदार

"कोसेसांव कॉस्ता हे सध्या काँग्रेस पक्षात नाहीत. बाबाशान ज्यावेळी काँग्रेस पक्ष सोडून गेले, त्यावेळी कोसेसांव हेही त्यांच्या बरोबर गेले होते."

- ज्यो डायस, दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com