Goa: शैक्षणिक संस्थांनी आधुनिक तंत्रज्ञानानाचा वापर करावा - आमदार सोपटे

असे प्रतिपादन मांद्रे मतदार संघाचे आमदार दयानंद सोपटे (MLA Dayanand Sopte) यांनी केले.
MLA Dayanand Sopte
MLA Dayanand SopteDainik Gomantak
Published on
Updated on

काळाच्या प्रवाहाबरोबर पुढे जाण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी (Educational Institutions) आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन मांद्रे मतदार संघाचे आमदार दयानंद सोपटे (MLA Dayanand Sopte) यांनी केले. कोरगाव येथील श्री शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वेब साईटचे अनावरण करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन श्री परशुराम गावडे (Parashuram Gawde) होते.

याशिवाय व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष श्री अशोक रेडकर,सचिव श्री मोहन आरोलकर,कार्यकारिणी सदस्य श्री रोहिदास भाटलेकर , प्राचार्य सुदन बर्वे, पालकशिक्षक संघाचे अध्यक्ष श्री मिलिंद तळकर, उपाध्यक्ष तथा हरमलचे सरपंच श्री मनोहर केरकर,उपाध्यक्ष धनंजय दाभाळे आदी उपस्थित होते.

MLA Dayanand Sopte
Goa: ऑनलाईन शिक्षणाचा मुद्दा मगोच्या आंदोलनात

यावेळी बोलताना आमदार श्री सोपटे म्हणाले, कोरोनाच्या काळात विध्यार्थी व शिक्षक समोरा समोर वर्गात बसून शिक्षण घेणे शक्य नसल्याने ऑन लाईन शिक्षण प्रणाली सुरू करावी लागली त्यात कोरोना मुळे विद्यालयात येवून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नसल्याने विद्यालय प्रवेश सुद्धा ऑन लाईन झाला.त्यासाठी वेब साईट अत्यंत गरजेची झाली आहे श्री कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पालक शिक्षक संघाने वेब साईट सुरू करून विद्यार्थ्यांची सोय केली आहे.विद्यालयात अनेक सुविधा उपलब्ध आहेत त्यात आता वेब साईट ची भर पडल्याने विद्यार्थ्यांना विविध विषयांची माहिती घरबसल्या मिळणार आहे.विद्यार्थ्यांनी त्याचा योग्य उपयोग करून शिक्षणात प्रावीण्य मिळवावे असे सांगितले.

MLA Dayanand Sopte
Goa: आपने हातघाईचे राजकारण केल्यास जशास तसे उत्तर देऊ : भाजपचा इशारा

कोविड महामारीच्या काळात आम्ही बरेच काही शिकलो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही एक कोविडची देणगी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.सरकारने शिक्षणा साठी अनेक योजना आखल्या आहेत त्याचा योग्य उपयोग करून गोवा हे एक शैक्षणिक दृष्ट्या नंबर वन राज्य करूया असेही ते म्हणाले. पालक शिक्षक संघाने पुढाकार घेवून शिक्षक आणि विद्यार्थ्यांची अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण केल्याबद्दल आमदार श्री सोपटे यांनी अभिनंदन केले.विद्यालयाला भविष्यात सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

MLA Dayanand Sopte
Goa: नवनियुक्त राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हिमाचल प्रदेश ला रवाना

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष मिलिंद तळकर यांनी आपल्या भाषणात शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले या वेब साईटचा वापर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी करावा असेही त्यांनी सांगितले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्री कमलेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन परशुराम गावडे म्हणाले विद्यालयाच्या उत्कर्षा साठी व्यवस्थापन मंडळ नेहमीच कार्यरत असते. पालक शिक्षक संघाच्या सहकार्यातून आज आपली वेबसाईट सुरू होते ही अत्यंत अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले.विद्यालयात विज्ञान शाखा सुरू करण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

MLA Dayanand Sopte
Goa: काणकोणात साधनसुविधांची वानवा

आमदार दयानंद सोपटे यांनी वेबसाईटचे अनावरण केले.नितीन आयिर यांनी यावेळी वेबसाईटची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्राचार्य सुदन बर्वे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.सौ.स्वाती वेंगुर्लेकर,सौ.जुही थळी,सौ. भारती पंचवाडकर ,सौ.दिपश्री सोपटे , नारायण कुडव ,प्रशांत रासाईकर ,समीर मांद्रेकर,अंकुश बुगडे,नेहाल कशाळकर, यांनी व्यासपीठावरील मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पालक शिक्षक संघाचे सचिव विठोबा बगळी यांनी केले.सौ.जुही थळी यांनी आभार मानले. कोरगाव येथील श्री कमलेश्वर उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या वेबसाईटचे अनावरण करताना मांद्रे मतदार संघाचे आमदार तथा पर्यटन महामंडळाचे चेअरमन दयानंद सोपटे,बाजूला श्री कमलेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन परशुराम गावडे,पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष मिलिंद तळकर,प्राचार्य सुदन बर्वे व अन्य मान्यवर.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com