Goa Water Falls Dainik Gomantak
गोवा

Goa Waterfalls : भीमतीर्थ धबधब्यामुळेमुळे पर्यटनाला बहर; पांडवकालीन गुंफा ठरताहेत पर्यटकांचे आकर्षण

हरवळेत तोबा गर्दी; रविवारी धबधब्यावर मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Waterfalls : हरवळे-साखळी येथील श्री रुद्रेश्वर मंदिरासमोर कोसळणाऱ्या भीमतीर्थ धबधब्याने रौद्ररूप धारण केले आहे. हे रौद्ररूप न्याहाळून त्यातून उडणारे तुषार अंगावर उडवून घेण्यासाठी आज रविवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत देशी पर्यटकांसह स्थानिकांनीही मोठी गर्दी केली होती. या धबधब्यासह हरवळेत असलेल्या पांडवकालीन गुंफांनाही पर्यटक भेट देत आहेत.

सतत पंधरा दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे हरवळेतील या धबधब्याला गेल्या शुक्रवारीच उधाण आले होते. शनिवारी तर हा धबधबा सर्व सीमा ओलांडून खाली कोसळत होता. त्यातून निर्माण होणारे तुषार या भागात येणाऱ्यांना परिसरात उभेही राहण्याची संधी देत नव्हते. रविवारी या धबधब्यावर मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता होती. त्याप्रमाणे आज सकाळपासूनच धबधब्यावर देशी तसेच विदेशी पर्यटकांनीही गर्दी केली होती. सेल्फी घेण्याचा मोहसुद्धा अनेकांना आवरला नाही.

भीमतीर्थ धबधब्‍याचा आनंद घेताना प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी. पाण्याच्या खोलीचा अंदाज नसलेल्यांनी पाण्यात उतरू नये. धबधब्याच्या परिसरात कचरा न करता तो कचराकुंड्यांमध्ये टाकावा. या स्थानाचे पावित्र्य राखा.

संगेश कुंडईकर, हरवळे देवस्थान समितीचे ॲटर्नी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT