Ganesh Chaturthi 2023 
गोवा

Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीसाठी कोकणात येताना टोलमाफीचा स्टिकर कसा मिळवाल? जाणून घ्या प्रक्रिया

गणपती बाप्पाचं स्वागत करण्यासाठी कोकणवासीयांनी दरवर्षीप्रमाणेच गावची वाट धरली आहे.

Pramod Yadav

Ganesh Chaturthi 2023: श्रावण सरता सरता सर्वांना गणेशोत्सवाचे वेध लागतात. सध्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सगळीकडे जोरदार सुरू आहे. कुठे ढोल ताशा पथकांचा सराव तर कुठे स्वागताची लगबग सुरु आहे. या सगळ्यामुळे वातावरण उत्साहाने दुमदुमून गेलंय.

गणपती बाप्पाचं स्वागत करण्यासाठी कोकणवासीयांनी दरवर्षीप्रमाणेच गावची वाट धरली आहे. अशा प्रवाशांसाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने आनंदाची बातमी देण्यात आली आहे. गणेश उत्सवासाठी गोव्यात येणाऱ्यांसाठी टोलमाफी देण्यात आली आहे.

राज्याचे बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी याबाबत ट्वविट करुन माहिती दिली आहे. मुंबई-बेंगलोर हायवे आणि मुंबई-गोवा हायवेवरून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना 16 सप्टेंबर ते 01 ऑक्टोबर 2023 दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व टोलनाक्यांवर टोलमाफी देण्यात येणार आहे. अशी माहिती चव्हाण यांनी दिली आहे.

कसे मिळवता येईल टोलमाफीचे स्टिकर?

टोलमाफीचा स्टिकर मिळवण्यासाठी तुम्हाला जवळच्या पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौकी किंवा आरटीओ कार्यालयाला भेट देऊन आपल्यासोबत कोकणात जाणाऱ्यांची माहिती नोंदवावी लागेल. त्यानंतर आपल्याला टोलमाफीचा स्टिकर देण्यात येईल. हा स्टिकर परतीच्या प्रवासातही लागू असेल.

गणपतीपूर्वी मुंबई गोवा महामार्गाची सिंगल लेन सुरु करण्याचे आश्वासन महाराष्ट्र सरकारच्या वतीने देण्यात आले आहे. सध्या महामार्गाची सिंगल लेन खुली करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

काही दिवसांपूर्वी महामार्गावरील कशेडी घाट बोगदा खुला करण्यात आला असून, या बोगद्यामुळे पोलादपूर ते कशेडी हे अंतर अवघ्या 10 ते 15 मिनिटांत कापता येणार आहे. वाहनाने जाणाऱ्या प्रवाशांचा जवळपास 45 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

दरम्यान, मनसेच्या वतीने राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर महामार्गावरुन टीका करण्यात आली आहे. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागणार आहेत. असा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT