Mumbai-Goa MSRTC Sleeper Coach: चाकरमान्यांनो गणपतीक येतात मा, मग आता एस्टीन आरामत निजान येवा

नव्या स्लीपर कोचमध्ये सर्व सुरक्षा यंत्रणांनी सुसज्ज प्रवाशांसाठी 30 स्लीपर आहेत.
Mumbai-Goa MSRTC Sleeper Coach
Mumbai-Goa MSRTC Sleeper Coach

Mumbai-Goa MSRTC Sleeper Coach: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) या आठवड्याच्या शेवटी दहा नवीन स्लीपर नॉन-एसी कोच लाँच करण्याच्या तयारीत आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.

गणेशोत्सवादरम्यान एक बस मुंबई ते पणजी कोकण मार्गे चालवली जाण्याची शक्यता आहे. नव्या स्लीपर कोचमध्ये सर्व सुरक्षा यंत्रणांनी सुसज्ज प्रवाशांसाठी 30 स्लीपर आहेत.

मुंबई ते पणजी मार्गावर धावणाऱ्या बसचे भाडे अद्याप निश्चित झाले नसून लवकरच ते जाहीर केले जाणार असल्याची माहिती आहे.

पुणे-नागपूर मार्गावरील स्लीपर बसमध्ये 45 आसन क्षमता आहे, यापैकी 15 जागा स्लीपर बर्थसाठी समर्पित असतील. यात प्रवाशांना प्रवासादरम्यान आराम करण्याची सुविधा मिळेल. उर्वरित 30 जागा पारंपारिक आसनांसाठी डिझाइन करण्यात आल्या आहेत.

नागपूर आणि पुणे येथून दुपारी 12 आणि सायंकाळी 5 वाजता दररोज दोन बसेस सुरु करण्याचा महाराष्ट्र परिवहन महामंडळाचा मानस आहे. या बसेस समृद्धी एक्स्प्रेस वेला बायपास करून अमरावतीमार्गे प्रवास करतील.

गणेश चतुर्थीपूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची सिंगल लेन सुरु होणार?

गणेश चतुर्थीपूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची सिंगल लेन सुरु करण्याचे आश्वासन महाराष्ट्र सरकारने दिले आहे. त्या दृष्टीकोनातून महामार्गावर जोमाने काम सुरु आहे. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी कोकणवासीयांना दिलेले वचन हामखास पूर्ण करणार असल्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे मार्गाची सिंगल लेन खुली झाल्यास प्रवास आणखी सुखर होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com