Gandhi Shastri Run Dainik Gomantak
गोवा

Gandhi Shastri Run: काणकोणमध्ये 'गांधी-शास्त्री रन'; 500 हून अधिक धावपटू धावणार, 5 किमी स्पर्धेचे आयोजन

Gandhi Shastri Run Canacona: बसस्थानकापासून सुरू झालेली धाव श्री मल्लिकार्जुन मंदिर परिसरात पूर्ण होणार आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

चावडी: महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त श्री मल्लिकार्जुन अँड श्री चेतन मंजू देसाई महाविद्यालय, देळे-काणकोण यांच्या पुढाकाराने रविवारी (ता. ४) ‘गांधी-शास्त्री रन’ या ५ किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ५०० हून अधिक धावपटू सहभागी होणार आहेत.

सकाळी ६.३० वाजता नोंदणी व क्रमांकवाटप सुरू होईल. त्यानंतर सुमारे ७ वाजता काणकोण बसस्थानकापासून धावण्यास सुरुवात होईल. बसस्थानकापासून सुरू झालेली धाव श्री मल्लिकार्जुन मंदिर परिसरात पूर्ण होणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांनाही सहभागाची संधी

या उपक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थी, खुला गट आणि ज्येष्ठ नागरिक अशा विविध गटांचा समावेश करण्यात आला आहे.

पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र श्रेणी ठेवण्यात आली असून विविध वयोगटांतील नागरिकांना सहभागी होता येणार आहे.

प्रत्येक सहभागीला ‘फिनिशर मेडल’

५ किलोमीटरची धाव पूर्ण करणाऱ्या प्रत्येक नोंदणीकृत सहभागीला ‘फिनिशर मेडल’ देण्यात येणार आहे. तसेच नियमानुसार प्रमाणपत्रे आणि रोख पारितोषिकांचे वितरण केले जाणार आहे. धावपटूंच्या सोयीसाठी मार्गावर सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. धाव पूर्ण झाल्यानंतर सहभागींसाठी नाश्त्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

आरोग्यासोबत मूल्यांचा संदेश

‘गांधी-शास्त्री रन’च्या माध्यमातून केवळ धावण्याला प्रोत्साहन देण्याबरोबरच निरोगी जीवनशैली, सामाजिक एकोपा, शिस्त आणि जबाबदार नागरिकत्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न आहे. विद्यार्थी, युवक, नागरिक आणि ज्येष्ठांना एकाच व्यासपीठावर आणणारा हा उपक्रम काणकोणातील क्रीडा व सामाजिक चळवळीला चालना देणारा ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Theft Case: शिरदोनमधील 12 लाखांच्या चोरीचा पर्दाफाश; भारतीय चलनासह डॉलर-पौंड अन् पासपोर्ट जप्त

Baina Flyover Accident: बायणा उड्डाणपुलावर काळाचा घाला; कठड्याला दुचाकीची धडक, 20 फूट खाली कोसळून दोघांचा मृत्यू

Highest T20 Record: ख्रिसस गेलचा 175 धावांचा महाविक्रम इतिहासजमा, दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज बनला नवा 'युनिव्हर्स बॉस'; रचला इतिहास VIDEO

Goa Affordable Housing: सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न साकारण्याच्या दिशेने मोठं पाऊल; पार्सेत 96,512 चौ. मी. सरकारी जमीन गृहनिर्माण मंडळाकडे

Asian Games 2026: गोल्फविश्वात भारताचा डंका! प्रणवी उर्सनं जिंकलं 'सुवर्णपदक', भारताची 24 वर्षांची प्रतीक्षा संपली; रचला नवा इतिहास

SCROLL FOR NEXT