goa shipyard explosion Dainik Gomantak
गोवा

सात दिवसानंतर चौथा बळी; रासई लोटली स्फोटात जखमी बिहारच्या कामागाराचा मृत्यू

Goa Shipyard Blast: शिपयार्डमध्ये सेही मरीन वेसल या बोटीचे बांधणीचे वेल्डिंगचे काम चालू असताना अचानक आगीचा भडका उडून सात कामगार होरपळे होते.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: रासई लोटली येथील विजय मरीन शिपयार्डमध्ये झालेल्या दुर्घटनेत चौथा बळी गेला आहे. अभिषेक कुमार असे मयताचे नाव असून तो बिहार राज्यातील आहे. गोमेकॉत त्याच्यावर उपचार चालू होते.

मागच्या शुक्रवारी (ता. १७) या शिपयार्डमध्ये सेही मरीन वेसल या बोटीचे बांधणीचे वेल्डिंगचे काम चालू असताना अचानक आगीचा भडका उडून सात कामगार होरपळे होते. त्यातील शेर अली एमडी अली व विनोद दिवान यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता, तर संतोष कुमार याला मागाहून गोमेकॉत मरण आले होते.

अभिषेक कुमार, महम्मद बाबुल, मनीष चौहान, सुरेंद्र कुमार हे कामगार गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले होते. त्यातील अभिषेक याचा मृत्यू झाला, तर उपचार घेत असलेल्या अन्य तिघांची कामगारांचीही प्रकृती चिंताजनक आहे, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, सध्या या यार्डाचे काम बंद ठेवण्यात आले आहे. तेथे पोलिस पहारा ठेवला आहे, अशी माहिती मायणा कुडतरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांनी दिली.

दुर्घटनेनंतर कारखाने आणि बाष्पक खात्यांना चौकशीत या यार्डमध्ये सुरक्षितेचे कुठलीही उपाययोजना नसल्याचे तपासात आढळून आले होते, या कंपनीने आपला अहवाल सात दिवसांच्या आत पाठवून द्यावा.

अन्यथा कायदेशीर कारवाई करू असा इशारा देताना कंपनीने सुरक्षा प्रणाली राबवावी, ऑडिटर करून अहवाल घ्यावा व त्याचा अहवाल सादर करावा असा आदेश दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT