दोन अग्निवीर जवानांचा गोव्यात मृत्यू, दुचाकी अपघातात गमावले प्राण

Indian Army jawans killed in Goa: दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या दुभाजकाला धडकली यात दोघांना गंभीर दुखापत झाली.
Two-wheeler accident Goa
Agniveer soldiers death in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दोन अग्निवीर जवानांचा गोव्यात झालेल्या दुचाकीच्या अपघातात मृत्यू झाला आहे. दक्षिण भारतातील असणारे दोघेही नौदलात कार्यरत होते. आगशी येथे बुधवारी (२२ ऑक्टोबर) पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.                                  

हरीगोविंद प्रसन्ना कुमार ( वय २२, रा. कोल्लम) आणि विष्णू (वय २१, रा. कोन्नूर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दोन्ही जवानांची नावे आहेत. कर्तव्यावरुन मुख्य तळाकडे (बेस कॅम्प) माघारी येताना त्यांचा अपघात झाला. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या दुभाजकाला धडकली यात दोघांना गंभीर दुखापत झाली.

Two-wheeler accident Goa
खरे गुन्हेगार मोकाट, आमच्या मुलांना अटक का केली? नरकासूर प्रकरणी होंडा ग्रामस्थ एकवटले, पोलिसांना निलंबित करण्याची मागणी

हरीगोविंद आणि विष्णू दोघेही गोव्यात विषेश कर्तव्यावर कार्यरत होते.  कोची येथील नौदलाच्या मुख्यालयातून जहाजावरुन ते गोव्यात दाखल झाले होते. चार वर्षीय अग्निवीर सेवा कार्यातील त्यांचे हे तिसरे वर्ष होते.

Two-wheeler accident Goa
ना भाकरीचा प्रश्न सुटला ना जीव वाचला; कोकण रेल्वेखाली सापडून दोन्ही पाय तुटले, ओडिशाच्या तरुणाचा गोव्यात मृत्यू

दोघांचा मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ठेवण्यात आला. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही जवानांची ओळख पटविल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. जवान हरीगोविंद यांच्या आई पी. के. शीजा कोल्लम जिल्हा रुग्णालयात मुख्य नर्स म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com