Lairai Devi Stampede Dainik Gomantak
गोवा

Goa Stampede: शिरगाव येथील देवी लईराईच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; सात भाविकांचा मृत्यू, 40 जण जखमी

Lairai Devi Stampede: शिरगाव येथील प्रसिद्ध देवी लईराईच्या जत्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी या उत्सवाला गालबोट लागले आहे.

Pramod Yadav

Shirgao Lairai Devi Jatra Stampede

डिचोली: राज्यातील प्रसिद्ध शिरगावच्या देवी लईराईच्या जत्रोत्सवात चेंगरा चेंगरी होऊन सात भाविकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच, 40 पेक्षा जास्त भाविक जखमी झाले आहेत. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. जखमी भाविका्ंना डिचोली आरोग्य केंद्र, म्हापसा जिल्हा रुग्णालय आणि गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लईराईच्या यात्रेत रात्रीच्या सुमारास चेंगरा चेंगरी झाली यात सात भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एक सतरा वर्षीय युवकासह इतरांचा समावेश आहे. तर, चाळीस पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत.

यात धोंडांचा देखील समावेश आहे. २० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी सध्या बचाव कार्य सुरु असून, जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे.

शिरगाव येथील प्रसिद्ध देवी लईराईच्या जत्रोत्सवाला शुक्रवार (०२ मे) पासून सुरुवात झाली. गोव्यासह शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या जत्रेला मोठ्या प्रमाणावर भाविक गर्दी करत असतात. दरम्यान, यात्रेच्या पहिल्याच दिवशी या उत्सवाला गालबोट लागले आहे.

काही भाविकांना उपचारासाठी अझिलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमदार चंद्रकांत शेट्ये, पेमेंद्र शेट आणि जिल्हाधिकारी स्नेहा गिते हे सध्या रुग्णालयात असून, जखमींची विचारपूस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT